एचसीएलटेककडून सुपरचा‍र्जिंग प्रोग्रेसTM चे नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंग लॉन्‍च

चसीएलटेककडून सुपरचा‍र्जिंग प्रोग्रेसTM चे नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंग लॉन्‍च 

नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंगमधून एचसीएलटेकची त्‍यांचे ग्राहककर्मचारीसमुदाय व भूमातेसाठी सुपरचार्ज प्रोग्रेसप्रती कटिबद्धता दिसून येते 

भारत व न्‍यूयॉर्कसप्‍टेंबर २७२०२२: एचसीएल टेक्‍नोलॉजीज (एचसीएलटेक) या आघाडीच्‍या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने आज त्‍यांची नवीन ब्रॅण्‍ड ओळख व लोगो लॉन्‍च केलेजो सुपरचार्जिंग प्रोग्रेस (Supercharging ProgressTM)च्‍या विशिष्‍ट पोझशनिंगवर आधारित आहेज्‍यामधून त्‍यांचे ग्राहककर्मचारीसमुदाय व भूमातेप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.  

कंपनीचा नवीन एचसीएलटेक’ ब्रॅण्‍ड व लोगो त्‍यांच्‍या गो-टू-मार्केट धोरणाशी संलग्‍न असेल आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल परिवर्तनाला अधिक चालना देणारा सेवा व उत्‍पादनांच्या त्‍यांच्‍या वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओला सादर करेल  

कंपनी १२ बिलियन डॉलर्स महसूल गाठण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर असताना एचसीएलटेकच्‍या अध्‍यक्षा रोशनी नादर मल्‍होत्रा यांनी एचसीएल ग्रुपसोबतचे संबंध कायम ठेवण्‍यासोबत वैशिष्‍ट्यपूर्ण जागतिक ब्रॅण्‍ड ओळख निर्माण करण्‍याकरिता एचसीएलटेकसाठी क्रांती म्‍हणून या घोषणेबाबत सविस्‍तरपणे सांगितलेत्‍या म्‍हणाल्‍या, ‘’एचसीएलटेकसाठी सुपरचार्जिंग प्रोग्रेस म्‍हणजे दररोज आमच्‍या ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तनाला चालना देणेतसेच आमच्‍या कर्मचार्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा प्रगत करण्‍याची कंपनीची तत्त्वेशाश्‍वतपूर्ण भूमातेप्रती योगदान देणे आणि जगभरात आम्‍ही कार्यरत असलेल्‍या ठिकाणी स्‍थानिक समुदायांची उन्‍नती करणे.’’  

एचसीएलटेकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक सी. विजयकुमार म्‍हणाले, ‘’आज आम्‍हाला आमचे उद्देशपूर्ण विधान – सुपरचार्ज प्रोग्रेससाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान व आमच्‍या कर्मचार्‍यांना एकत्र आणणे हे सादर करताना अभिमान वाटतो. आमचा उद्देश वैविध्‍यपूर्ण सेवा व उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून जगभरातील उद्योगांसाठी पसंतीचा डिजिटल सहयोगी असण्‍याच्‍या आणि अव्‍वल टॅलेण्‍टसाठी पसंतीची कंपनी असण्‍याच्‍या आमच्‍या प्रवासाला चालना देतो. यामधून आम्‍ही कार्यरत असलेल्‍या भागांमधील समुदायांच्‍यातसेच भावी पिढ्यांसाठी शाश्‍वतपूर्ण भूमातेच्‍या सर्वसमावेशक विकासाप्रती योगदान देणे सुरू ठेवण्‍यासाठी आमची जबाबदारी दिसून येते.’’ 

नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंगचे तर्क व्‍यक्‍त करत सी. विजयकुमार पुढे म्‍हणाले, ‘’सुपरचार्जिंग प्रोग्रेस आम्‍ही आमचे गाहककर्मचारीसमुदाय व भूमातेसाठी झपाट्याने व मोठ्या प्रमाणात आज करत असलेल्‍या कामाच्‍या तत्त्वालातसेच अधिक प्रयत्‍न करण्‍याप्रती आमच्‍या महत्त्वाकांक्षेला दाखवते.’’  

कंपनीने नवीन एम्‍प्‍लॉयी व्‍हॅल्‍यू प्रोपोझिशन (ईव्‍हीपी) – फाइण्‍ड युअर स्‍पार्क’ देखील लॉन्‍च केले. संधीआदर व विश्वासार्ह रोजगाराच्या व्यापक तत्त्वांवर आधारित एचसीएलटेकचे ईव्‍हीपी विद्यमान व संभाव्य कर्मचार्‍यांना त्यांच्या करिअरची क्षमता आणि महत्त्वाकांक्षा वाढवण्यास मदत करण्याच्या आपल्‍या कटिबद्धतेवर अधिक भर देते. कंपनीने शिक्षण व रोजगारआरोग्यकल्याण व मुलभूत गरजा व पर्यावरण या प्रमुख आधारस्‍तंभांमधील आपल्या प्रयत्नांना सुपरचार्ज करण्यासाठी जागतिक सीएसआर भागीदारी आणि स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचा विस्तार केला आहे. 

आजचा दिवस एचसीएलटेकच्या उत्‍साहवर्धक प्रवासातील एक प्रमुख उपलब्‍धी आहे, कारण आम्ही एक वेगळी ब्रॅण्‍ड ओळख व उद्देश तयार केला आहे, जो आमच्या प्रवासाच्या या पुढच्या टप्‍प्‍यात वेगाने आम्हाला सामर्थ्य देईल,” असे एचसीएलटेकच्‍या मुख्य विपणन अधिकारी जिल कौरी म्‍हणाल्‍या. ‘’असा संपन्‍न वारसाजागतिक दर्जाची डिलिव्‍हरी सेवा आणि ग्राहक सेवेवर भर देण्‍यासह आम्‍ही नेहमीच स्थिरतेचा उत्‍साह आणि अस्‍सल सहयोगी असण्‍याप्रती कटिबद्धतातसेच प्रत्‍येक टप्‍प्‍यावर आमच्‍या ग्राहकांसोबत प्रयत्‍न कायम ठेवू.’’  

एचसीएलटेकने पुरस्‍कार-प्राप्‍त एजन्‍सी समवनसोबत सहयोगाने काम करत त्‍यांची नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंग व ओळख निर्माण करण्‍यामध्‍ये मदत केली. अधिक माहितीसाठी https://www.hcltech.com/supercharging-progress येथे भेट द्या 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..