“ALL IS WELL” म्हणत येतोय बिग बॉस मराठीचा नवा सिझन

 “ALL IS WELL” म्हणत येतोय बिग बॉस मराठीचा नवा सिझन!

बिग बॉस मराठी सिझन चौथा २ ऑक्टोबर संध्या. ७ वा. आणि सोम ते शुक्र रात्री १०. वा. आणि शनि - रवि रात्री ९. ३० वा.!

बिग बॉस मराठी सिझन ४ पॉवर्ड बाय AIRTEL, स्पेशल पार्टनर म्हणून A23 & FINOLEX PIPES यांचा सहभाग ~

 

मुंबई २६ सप्टेंबर२०२२ : मराठी मनोरंजनाचा बाप परत येतोय ! ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतोज्याने लॉकडाउनमध्ये एंटरटेनमेंट अनलॉक केलंसुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या बातम्यांना आणि चर्चेला उधाण येतंआणि तो येताच सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा असते. कारण चर्चा त्याचीच होते ज्यात काही खास असतं ! यावर्षी तो परत येतोय अधिक भव्य स्वरूपातकाही नव्या सरप्राईझेसना घेऊन. तो सज्ज आहे नव्या सदस्यांसोबतनव्या रूपात. आता ते घर परत येत आहे. एक असं घर ज्याने सदस्यांचे भांडण-वाद विवाद बघितलेअसं घर ज्याने नाती कशी निभवावी हे शिकवलं,जीवनाकडे कसं बघावं आणि कसं जगावं हे शिकवलं. ज्याने सदस्यांची अनेक रूपं पाहिली. “त्या” घरात विविध,बहुरंगी स्वभावांच्या व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार. त्या घराचा दरवाजा पून्हा उघडणारकारण कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारामराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन ४ सज्ज आहेमराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे,मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

तेंव्हा नक्की बघा आपल्या लाडक्या महेश मांजरेकरांसोबत बिग बॉस मराठीचा हा नवा सिझन. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित बिग बॉस मराठी सिझन ४ पॉवर्ड बाय AIRTEL, स्पेशल पार्टनर म्हणून A23 आणि FINOLEX PIPES यांचा सहभाग. बिग बॉस मराठी सिझन ४ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे २ ऑक्टोबर संध्या. ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच नक्की बघा त्यानंतरचे भाग दर सोम ते शुक्र रात्री १०. वा. आणि शनि - रवि रात्री ९. ३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. बिग बॉस मराठीच्या  घरातील सदस्यांची धम्माल मस्तीएकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढीमध्ये खूपच उत्सुकता असते. यावेळेसदेखील VOOT वर 24-तास लाइव्ह फीडप्रेक्षकांचे आवडते सेगमेंट आरोपी कोण आणि चुगली बूथ, कार्यक्रमाचे मूळ भागअनदेखा आणि प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक कधीही बघू शकतील.

घर म्हटलंआणि त्यातून जर चार माणसं एकत्र आली की भांडयाला भांड हे लागतचं. बिग बॉसच्या मराठीच्या या सिझनमध्ये १६ जण एका घरामध्ये राहाणार आहेत ते पण १०० दिवस. म्हणजे रोज तक्रारी होणारतर कधी हास्य बहार, कधी प्रेम,तर कधी भांडणं... कधी रुसवे - फुगवे तर कधी मैत्री... आपल्या घरात आपण जशी शुल्लक गोष्टींना घेऊन भांडणं करतो तसेच या घरात देखील होणार.

 

आता ज्या घरात १६ वेगवगेळ्या विचारसरणीची माणसं राहणार तिथे हे आलंच की हो ! पणमुद्दा असा किया घरात झालेली भांडणंवादविवादच लोकांना आधी आठवतात. पण चांगल्या घडलेल्या गोष्टी तुम्हांला आठवतात का? आता तुम्हांला प्रश्न पडेल

किऑल ईज वेल असं का बरं कळेल लवकरच कळेल. या घरातदेखील सगळं आलं ईज वेल दिसेल का या सदस्यांना घरामध्ये एकमेकांसोबत तब्बल १०० दिवस रहायचं म्हणजे काही सोपं नाही ! ह्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांची अनेक रूपं प्रेक्षकांनी पडद्यावर पाहिली आहेत,पण आता उलगडणार त्यांचं खरं रूप. ऑल ईज वेल म्हणणं सोपं आहे पण ते कितपत निभावू शकतील बघूया !... कारण या घरापासून काहीच लपलेलं नाहीये.


व्यवसाय प्रमुख- कलर्स मराठी, (वायकॉम18) अनिकेत जोशी म्हणालेबिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा अत्यंत आवडता रिऍलिटी शो आहे. बिग बॉस मराठीला पहिल्या पर्वापासून अभूतपूर्व यश मिळाले आहे. आणि त्याचं कारणं म्हणजे या शो खेरीज असा कुठलाच अनस्क्रीपटेड रिॲलिटी शो नाही जो स्पर्धकांमधील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो. याचमुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकवर्गात होणारी वाढ आणि कार्यक्रमाशी प्रेक्षक जोडले जाणे याची असंख्य कारणे आहेत मग ते सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं असो वा त्यांचा प्रवासत्यांची भांडणं किंवा कार्यक्रमाचं स्वरूपम्हणूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांसोबतच जाहिरातदारांच्या देखील आवडीचा कार्यक्रम आहे. कारणत्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळते. मला खात्री आहे कि या सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल".


प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी (वायकॉम18)विराज राजे म्हणाले, “बिग बॉस मराठी हे नावं आलं किसगळयांना पहिले आठवतं ते म्हणजे भांडणवाद. पणया कार्यक्रमात बऱ्याचश्या चांगल्या गोष्टी देखील घडतात. म्हणून यावेळेसची बिग बॉस मराठीची थीम देखील "ऑल ईज वेल" हि आहे. आता सगळयांना प्रश्न पडेल म्हणजे काय जर प्रत्येक सिझन बघितला तर आपल्याला हे कळेल कि प्रत्येक सिझनमध्ये काहीना काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. काही जणांना शोमुळे वैयक्तिक पातळीवर किंवा त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा झाला. याचसोबत या कार्यक्रमात मैत्री दिसलीआपुलकी दिसलीनाती बनलीव्यक्तिमत्वात बदल झाले. या संपूर्ण काळात व्यक्तिमत्वाला पैलू पडत असतात. कारण बिग बॉस सारखा शो करायला प्रचंड मानसिक ताकद लागते. हे सगळं असूनसुद्धा शेवटी लक्षात राहतं ते फक्त मारामाऱ्याभांडणं. बिग बॉस मराठीच्या घरात १६ वेगळ्या स्वभावाची माणसं येतात आणि एकेमकांशी आयुष्यभराचं नातं जुळवून जातात. याच धारणेला कुठेतरी पुढे घेऊन यावेळेस घराची रचना करण्यात आली आहे जी तुम्हांला लवकरच कळेल. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सकरात्मक दृष्टिकोन देणारा आणि माणसांमध्ये चांगले बदल घडवणारा असा कार्यक्रम आहे. यावेळेस देखील आमच्या शोला रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल अशीच आशा आमची संपूर्ण टीम करते आहे". 


एक घर ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतातअसचं एक घर चार वर्षांआधी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या घरावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलंत्यातील सदस्यांना आपलसं केलं आणि आता तेच घर परतंय पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात. आणि ते म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. या घरामध्ये यावर्षी काय विशेष असेल काय बदल करण्यात आले असतील कोणती थीम असेल बिग बॉस मराठीचं या सिझनमधील घर खूप खास आणि आलिशान असणार आहेबिग बॉसचे घर जे जवळपास १४,००० चौरस फूट

अश्या भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. सगळ्यात पहिले घरामध्ये दाखल झाल कि, एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसून येते ती म्हणजे घरामध्ये रंगांचा अतिशय सुंदररित्या

केला गेलेला उपयोग आणि त्यामुळेच घर प्रसन्नआकर्षक वाटतं. विविध रंगांनी नटलेलं हे बिग बॉस मराठीचं नवं घर कलर्स मराठीला साजेसं असं असणार आहे.


"संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती ती म्हणजे या सीझनचे सूत्रसंचालन कोण करणार हे जाणून घेण्याची. आणि यावर चर्चा देखील चागंलीच रंगली. याबाबत प्रेक्षकांनी अनेक तर्क लावले. महेश मांजरेकरच यावर्षी देखील सूत्रसंचालक असणार हे कळताच सगळयांनाच आनंद झालापण यावर्षी शाळा जरा वेगळी असणार आहे म्हणजे नक्की काय यावर अनेक बोललं गेलेमहेश मांजरेकर नव्या सिझनबद्दल बोलताना म्हणाले"बिग बॉस  मराठी हा माझ्या अत्यंत जवळचा कार्यक्रम आहे. यावर्षीचा सिझन सगळयांसाठीच खास असणार आहे. कारणस्पर्धक आणि माझ्याततसेच येणाऱ्या पाहुण्यांमध्ये काचेची भींत नसेल. नवा सिझन

म्हणजे काहीतरी वेगळं असणारचं. मी यावेळेस जरा "वेगळी शाळा" घेणार आहे. आता त्यात नक्की काय असेल हे प्रेक्षकांना कळेलच. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम अनिश्चित वळणांचा आहेसदस्यांच्या भाव भावनांची कसोटी लागते संयम अतिशय महत्वाचा पण यावेळेस तर "ALL IS WELL" असणार आहे. बघूया सदस्य यावर कसे खरे उतरतील. तुम्हा प्रेक्षकांसारखा मी देखील उत्सुक आहे नव्या सदस्यांना भेटायला."


बिग बॉस मराठी सिझन चौथा याबाबत बोलताना सीईओएंडेमॉल शाइन इंडिया ऋषि नेगी म्हणालेबिग बॉस मराठी सीझन म्हणजे रोमांचकमनोरंजक आणि थरारक ! Endemol Shine India मध्ये आमच्यासाठीआमच्या प्रेक्षकांचा आनंद सर्वोपरि आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो जेणेकरून स्पर्धक आणि आमचे दर्शक सतत गुंतलेले असतील. प्रत्येक आठवड्यात अनपेक्षित वळणं असतातमहेश मांजरेकर स्पर्धकांना आठवड्यात झालेल्या घटनांबद्दल प्रश्न विचारतात. अनेक ट्विस्ट आणि वळणे या सिझनमध्ये देखील असणार आहेत…. म्हणून,तयार राहा !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १६ सदस्य १०० दिवस. कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धकांद्वारे तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नॉमिनेट करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरी पर्यंत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टिकून राहील तो ठरेल चौथ्या सिझनचा विजेता स्पर्धक. तेव्हा सज्ज व्हा बिग बॉस मराठी सिझन ४ साठी येत्या २ ऑक्टॉबर संध्या. ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शुक्र रात्री १०. वा. आणि शनि - रवि रात्री ९. ३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

चुकून राहलंच तर विसीट करा www.colorsmarathi.com ... तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathi त्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathiS4 | इंस्टाग्राम आणि ट्विटर युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते @Colorsmarathiofficial आणि @ColorsMarathi यावर...

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..