अमृता फडणवीस यांनी ‘दिव्याज फाऊंडेशन’च्या ‘CLEANATHON 2023’..

अमृता फडणवीस यांनी दिव्याज फाऊंडेशनच्या ‘CLEANATHON 2023’च्या उपक्रमातून राबवली मुंबईतील या वर्षाची सर्वात मोठी समुद्र स्वच्छता मोहिम

अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्र किना-यांची कशी अवस्था झालेली असते हे प्रत्येकाला माहित आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुंबईतील समुद्राची स्वच्छता राखण्यासाठी दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस नेहमीच पुढाकार घेतात. नुकतीच त्यांनी मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवली. २९ सप्टेंबरच्या सकाळी स्वच्छता मोहिम घटनेचे प्रत्येकजण साक्षीदार होते. आसिफ भामला यांच्या भामला फाऊंडेशन’ सोबत दिव्याज फाउंडेशन’ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM)’ यांनी ‘CLEANATHON 2.0, 2023’ महासागर कचरा व्यवस्थापन आयोजित केले होते.  श्रीमती अमृता फडणवीस यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महत्त्वाच्या व्यक्तीराजकीय नेते आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार राजकुमार रावसैयामी खेरईशा कोप्पीकरजॅकी भगनानी आणि मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर आदी कलाकारांकडून देखील पाठिंबा मिळाला आणि त्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवली.

श्री. विवेक फणसळकर जी (मा. मुंबईचे पोलीस आयुक्त)श्री. इक्बाल सिंह चाहल जी (मा. महानगरपालिका आयुक्त आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक)श्री. अमीत भास्कर साटम जी (मा. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य)श्री मंगल प्रभात लोढा जी (मा. पर्यटन मंत्रालयकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय)श्री राहुल नार्वेकर जी (मा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष) आणि श्री. श्रीकांत शिंदे जी (लोकसभा सदस्य) या मान्यवर व्यक्ती देखील या कार्यात सामील झाले होते.

सागरी जनजीवनाचे संरक्षण करणे आणि कचरा व्यवस्थापन पद्धती बाबतीत जनजागरुकता निर्माण होणे या उद्देशाने आजोजित करण्यात आलेल्या CLEANATHON 2023 या मोहिमेत समर्थकस्वयंसेवक अशी एकूण ५००० जणांची टीम या मध्ये सहभागी होती.

या मोहिमेत सहभागी झालेला अभिनेता राजकुमार राव याने त्याची भावना व्यक्त करताना म्हटले की, “अमृता फडणवीस जी यांच्यासोबत जुहू चौपाटीवरसमुद्र संवर्धनाची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'क्लीन-ए-थॉन 2.0' 2023 मोहिमेत सामील होण्याचा मला आनंदच आहे. समुद्र हा आपल्या पृथ्वीचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या संरक्षणेसाठी सर्वांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. माझं असं मत आहे कीएका चांगल्या कामासाठी करण्यात आलेला सामूहिक प्रयत्नकितीही लहान असला तरी तो मोठा प्रभाव निर्माण करु शकतो.

श्रीमती अमृता फडणवीस यांनी हा कार्यक्रम किती महत्त्वाचा होता आणि त्याची किती गरज आहे हे या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी पुढे म्हटले की, "'क्लीन-ए-थॉन 2.0' 2023 जुहू बीच आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आणि दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलते. आपल्या महासागराची काळजी घेणेत्याला स्वच्छसंरक्षितनिरोगी ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. 'क्लीन-ए-थॉनहा केवळ एक कार्यक्रम नसून हे आपल्या पर्यावरणाप्रती त्याची संरक्षा करण्याचं वचन आहे आणि प्रत्येकाने आपल्या निसर्गाचे महत्त्व समजून त्याचे जतन करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. या उपक्रमाचा भाग झाल्याबद्दल आणि आपल्या निसर्गाला स्वच्छ,निरोगी ठेवण्याच्या दिशेने पुढाकार घेतल्याचा मला फार आनंद होत आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे अशा मोहिमेत उपस्थित राहून पुढील पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य तयार करु शकतोम्हणून या उपक्रमात सामिल होण्यासाठी मी सर्वांना मनापासून आमंत्रण देते.

इतकंच नव्हे तर, ‘CLEANATHON 2023’ ने आपल्या निसर्गाचे आणि सागरी जीवनाचे महत्त्व याविषयी जागरुकता निर्माण करुन तरुण मंडळी आणि नागरीकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या जागरुकतेमुळे पर्यावरण संरक्षण केले जाऊन येण्या-या पिढीसाठी शाश्वत भविष्य तयार होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..