'एकदा येऊन तर बघा'..

 'एकदा येऊन तर बघा'

सध्या सोशल मीडियावर 'दिखा दूंगाहा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत 'एकदा येऊन तर बघा'  हा नवा ट्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच हा नवा ट्रेंड कोण आणतंय? 'एकदा येऊन तर बघाअसं म्हणतलेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार आहेत. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघाया चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटरराजेशकुमार मोहंतीदिपक क्रिशन चौधरीसेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभनसत्यनारायण मूरथी,  डॉ. झारा खादर यांची आहे.

'एकदा येऊन तर बघाचित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरीविनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट  विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. गिरीश कुलकर्णीसयाजी शिंदेभाऊ कदमतेजस्विनी पंडितपॅडी कांबळेओंकार भोजनेप्रसाद खांडेकरविशाखा सुभेदार,  राजेंद्र शिसाकर,  नम्रता संभेराववनिता खरातशशिकांत केरकर,  रोहित मानेसुशील इनामदारआदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज प्रेक्षकांना खदखदून हसवणार आहे. एकदा येऊन तर बघा’ प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट असणार आहे. सात दिग्गज दिग्दर्शकांच्या घोषित झालेल्या सात मराठी चित्रपटांच्या शृंखलेतील ही दुसरी चित्रपट कलाकृती आहे. या आधीच्या 'अफलातूनया मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता.

'एकदा येऊन तर बघाचित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथासंवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहनकश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना  तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.  

येत्या २४ नोव्हेंबरला 'एकदा येऊन तर बघाही मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..