लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट       

मनोरंजनाची चवदार पाणीपुरी’ चित्रपटगृहात

झणझणीततिखटकुरकुरीतआंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं कीप्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला पाणीपुरी हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्करअनिकेत अग्रवाल आहेत.  

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंदप्रेमविश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन पाणीपुरी हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडेसायली संजीवऋषिकेश जोशीविशाखा सुभेदारभारत गणेशपुरेप्राजक्ता हनमघरकैलास वाघमारेशिवाली परबप्रतिक्षा जाधवसचिन बांगरअनुष्का पिंपुटकरअभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून  पाणीपुरीची चव आपल्याला  चाखायला देणार आहेत. 

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटेअजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत. 

मनोरंजनाची ही चटकदार पाणीपुरी १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight