'आतली बातमी फुटली' चित्रपटातून मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र

'आतली बातमी फुटली' रंगभूमीवर चित्रपटातून मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र

आजपर्यंत दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात काम करणे काही नवीन नाही; पण मराठीत असा सुवर्णयोग फार क्वचितच पाहायला मिळतो.  'आतली बातमी फुटली' या सिनेमाच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघांनी अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशा दोन कलासंपन्न कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. विशाल पी.गांधी आणि जैनेश इजरदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  येत्या ६ जूनला  'आतली बातमी फुटली'  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

या दोन दिग्गजांची चित्रपटात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या दोघांच्या अभिनयाची वेगळी केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सामान्य माणसाच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकांनी वर्तमानातील कटू सत्य पडद्यावर सादर केलं आहे.

वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी व जैनेश इजारदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तरसंकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी रचली आहे, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवादलेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने 'आतली बातमी फुटली' या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO