इंटेरिओतर्फे आधुनिक भारतीय कार्यालयांसाठी लवचिक कॅफे फर्निचर सोल्युशन्स सादर
~ आर्थिक वर्ष 26 मध्ये इन्स्टिट्युशनल फर्निचर रेंजमध्ये 45 नवीन SKUs सादर करण्याची योजना ~
~ पुढील 2 वर्षांत 19% वार्षिक वाढीचे लक्ष्य ~
मुंबई, 17 जून 2025: गोदरेज एन्टरप्राईजेस समूहाअंतर्गत भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँड्सपैकी एक असलेल्या इंटेरिओने आधुनिक कार्यालयांसाठी वर्कस्पेस फर्निचर मध्ये पेप अप कॅफे टेबल रेंज ही एक अभिनव गोष्ट सादर केली आहे. ही नवीन फर्निचर श्रेणी कार्यक्षमता, स्टाईल आणि एर्गोनॉमिक आराम यांचे एकत्रित मिश्रण असून आधुनिक कार्यालयांमध्ये छान, अनौपचारिक सहयोग जागा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत आहे.
भारतातील विविधतेने भरलेल्या कार्यस्थळांच्या सतत बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेले पेप अप हे ब्रेकआऊट झोन्स, ऑफिस कॅफेज, लाऊंज एरियाज आणि मीटिंग कॉर्नर्ससाठी आदर्श ठरणारे विविध फॉर्म्स, रंग आणि फिनिशेसचे आकर्षक मिश्रण सादर करते. पॉड, रॉड आणि 4 लेग टेबल्स या तीन आधुनिक अंडरस्ट्रक्चर डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेली ही रेंज आजच्या गतिशील आणि सहयोगात्मक कार्यसंस्कृतीस पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बीटूबी व्यवसाय प्रमुख समीर जोशी म्हणाले, “इंटेरिओ मध्ये आम्ही मानवकेंद्री दृष्टिकोनातून उत्पादने तयार करतो आणि कार्यस्थळांसाठी लवचिक, सहजसुलभ उपाय सादर करतो. पेप-अप हे केवळ टेबल नाही. माणसांना एकत्र जोडणारे साधन आहे. हे कर्मचाऱ्यांना एकत्र आणते, सर्जनशील संवादास प्रोत्साहन देते आणि जिथे कल्पना फुलतात अशा उत्साही कोपऱ्यांची निर्मिती करते. या नवीन सादरीकरणासह लवचिक, टिकाऊ आणि उत्कट, अभिव्यक्त फर्निचर सादर करून आम्ही काम आणि विश्रांतीच्या जागांमधील सीमा मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. गोदरेज इंटेरिओचा संस्थात्मक फर्निचर व्यवसाय आर्थिक वर्ष 27 पर्यंत 19% ने वाढण्याची अपेक्षा आहे आणि पुढील दोन वर्षांत आम्ही इन्स्टिट्युशनल फर्निचर विभागामध्ये 45 पेक्षा अधिक नवीन SKUs सादर करण्याची योजना आखली आहे.”
तंत्रज्ञानातील प्रगती, आधुनिक वर्कस्पेस डिझाइन आणि नव्या कार्यालय सेटअप्समुळे आधुनिक भारतीय कार्यस्थळामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. कॉर्पोरेट कॅफेटेरियाज आता केवळ सोयीसाठी असलेल्या सुविधा न राहता कर्मचाऱ्यांचे समाधान होईल आणि त्यांची उत्पादकता वाढेल यादृष्टीने महत्त्वाचे साधन बनले आहेत. आता त्या केवळ झटपट जेवणासाठीच्या जागा न राहता, कर्मचाऱ्यांमध्ये समुदायभावना आणि कल्याण वृद्धिंगत करणारे केंद्रबिंदू ठरल्या आहेत. या जागा नेटवर्किंग आणि सहयोगाला प्रोत्साहन देतात. या अशा जागा आहेत जिथे कॉफीच्या कपासोबत किंवा सामायिक जेवणाच्या वेळी मोकळेपणाने कल्पनांची देवाणघेवाण होते. कॅफेटेरियामधील अनौपचारिक आणि आरामदायी वातावरण अर्थपूर्ण संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करते. त्यातून शेवटी सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.
पेप-अप रेंज पॉड, रॉड आणि 4-लेग या तीन वैशिष्ट्यपूर्ण अंडरस्ट्रक्चर डिझाइन्सच्या माध्यमातून चौरस, गोलाकार आणि आयताकृती अशा विविध आकारांमध्ये आणि सर्वसाधारण व ऊंच टेबल पर्यायांसह लवचिक इंटीरियर लेआउटसना पाठबळ देते. डायनिंग विभाग, ब्रेकआऊट जागा, वैयक्तिक चर्चा आणि प्रतीक्षा कक्ष अशा वेगवेगळ्या कामांसाठी विविध फ्लोअर प्लॅन आणि कार्यसंस्कृतींमध्ये हे फर्निचर सहजपणे सामावून जाते. वैविध्यपूर्ण रंग आणि साहित्य मिश्रणामध्ये, सॉलिड आणि वूड ग्रेन फिनिशेससह उपलब्ध असलेली ही टेबल्स आधुनिक भारतीय कार्यालयीन सौंदर्यशास्त्रात सहज मिसळतात, उच्च दर्जाची आणि तंत्रज्ञान-सुसंगत लवचिकता प्रदान करतात आणि समकालीन कार्यस्थळ जीवनशैलीला अधिक समृद्ध करतात.
Comments
Post a Comment