मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या फोटोवर कलाकारांनी दिल्या 'या' प्रतिक्रया

मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या फोटोवर कलाकारांनी दिल्या 'या' प्रतिक्रया

प्रेमकथेतील 'हिरो' जाणून घेण्याची सगळ्यांचा उत्सुकता

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडेने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती एकटीच नाही, तर तब्बल सहा लोकप्रिय अभिनेत्यांच्या संगतीत आहे!  ‘मना'चे श्लोक या आगामी चित्रपटात हे सहा अभिनेते दिसणार असल्याचं आधीच समोर आलं होतं, परंतु आता या नव्या फोटोमुळे चाहत्यांच्या आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.

फोटो पोस्ट करताच मृण्मयीच्या कमेंटबॉक्समध्ये कलाकार मित्रमंडळींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिजित खांडकेकरने मिश्कीलपणे विचारले आहे, “समजा सात हिरो असते तर खूप बदलली असती का गोष्ट ?”, तर अमेय वाघ म्हणतो, “आमचे दिल आणि दोस्ती बरोबर कास्ट केले आहेस! मला मात्र दुनियादारी दाखवलीस! सिद्धार्थ चांदेकर खोचकपणे  म्हणतो, '' हे आहेत का गं तुझे मनाचे श्लोक ? तुझ्या पोपटी चौकटीतून मला बाहेर काढलंस ? थँक्स गं मृण्मयी'' तर 

अनेक जण  खट्टूही झाले आहेत, मृण्मयीची बहीण गौतमीही तिच्यावर नाराज आहे. ती म्हणते, '' सहा हिरो असताना अजून एखादी हिरोईन वाढवली असती (म्हणजे मी) तर काय बिघडलं असतं?'' काही जणांनी मृण्मयीचे कौतुकही केले आहे. एकंदरच या एका फोटोने मराठी सिनेसृष्टीत प्रचंड चर्चा रंगली आहे.  या सगळ्या चर्चा, गंमती-जमतींमध्ये एक मोठा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात घर करत आहे, तो म्हणजे या सहा जणांपैकी मृण्मयीचा हिरो नक्की कोण? राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब. या सगळ्यांनी तिच्यासोबत झळकण्याची तयारी दाखवली आहे, परंतु कथेतली मुख्य जोडी कोण असणार, याबाबत मात्र अजूनही गूढ कायम आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच एवढ्या चर्चेत आलेल्या ‘मना'चे श्लोककडे आता प्रेक्षक अधिकच आतुरतेने पाहू लागले आहेत. मृण्मयी आपल्या हिरोचं नाव कधी उघड करणार, हे पाहाणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे!

गणराज स्टुडिओ आणि 'संजय दावरा' एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ चे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले असून येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K