कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट घेऊन येत आहे एक दर्जेदार गाणं “सुंदरा”
कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट घेऊन येत आहे एक दर्जेदार गाणं “सुंदरा”
गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक दर्जेदार गाणं “सुंदरा”. या गाण्याची माहिती अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे कॅप्शन देत त्याने पोस्ट शेयर केली आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की निकची सुंदरा नेमकी कोण असेल?. सूत्रांच्या मते हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Post a Comment