सह्याद्री देवराई चे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे माईमीडिया च्या"मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५" ने सन्मानित!

 सह्याद्री देवराई चे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे माईमीडिया च्या"मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५" ने सन्मानित!

मराठीहिंदीतेलुगुतमीळकन्नडगुजरातीभोजपुरीमल्याळीइंग्रजी... आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्यांपैकी एक सयाजी शिंदे!

रुपेरी पडद्यावर खलनायक ताकदीनं रंगवणारे पण  प्रत्यक्ष आयुष्यात  नायक म्हणून त्यांचे काम अधिक महत्त्वाचं ! पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात करणारे राज्यभरात अनेक वृक्षारोपण मोहिमा राबवल्यास्वतः २५ हजारांहून अधिक झाडं लावली त्यामुळे अनेक उजाड माळरानं  वृक्षवेलींनी बहरली.पर्यावरण रक्षणासाठीचे हे योगदान मोलाचे!

सह्याद्री देवराई च्या रुपाने  एक सक्षम निसर्गाचं विश्व उभं करणारे..झाड़ कशी लावावी ते वाचवावी यासोबत महाराष्ट्रात कोणती झाड़ लावली तर निसर्ग संवर्धन होऊन मानवहित साधलं जाईल याचं भान व आपला अभ्यास व झपाटून काम करणारा अवलिया कलावंत सयाजी शिंदे यांना या अनमोल योगदानासाठी माईमीडिया24 आयोजितप्लँनेट मराठी च्या सहकार्याने"मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया' (माई)च्या मीडिया एक्सलन्स एवाँर्ड२०२५ने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटाच्या शुटिंग मधे व्यस्त असल्याने ते पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत आणि म्हणूनच त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कार्यक्षेत्राचे ठिकाणी जाऊन प्रदान करण्यात आला.

माई मीडिया२४ च्या संस्थापक मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकरकार्याध्यक्ष सचिन चिटणीसकोषाध्यक्ष व मुंबई जिल्हा अध्यक्ष चेतन काशीकर मुंंबई शहर संघटन समन्वयक गणेश तळेकरमुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे व  कार्यकारिणी सदस्य व लोककला अभ्यासक  सुरज खरटकमल यांनी  प्रदान केला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K