"निशांची" — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने प्रदर्शित केले 'निशांची' चित्रपटाची तारीख जाहीर; ऐश्वर्या ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण!

"निशांची" — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट 'निशांची' यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.

चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे दमदार पदार्पण करत असून, त्यांच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

'निशांची' ही एक सशक्त आणि उत्कट क्राइम ड्रामा कथा असून, दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची, वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटांवर चालत असताना त्यांच्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम होतात, याचे प्रभावी चित्रण करते. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

इंस्टाग्राम लिंक:

[🎥 पाहा - निशांची ट्रेलर (Instagram)](https://www.instagram.com/reel/DK9OVNBz-k5/?igsh=dTBpbHZiMmN5am5q)

अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि प्राइम व्हिडिओचे इंडिया ओरिजिनल्सचे डायरेक्टर आणि हेड, निखिल मधोक यांनी सांगितले,  “अनुराग कश्यप यांच्यासारख्या दिग्दर्शकाशी काम करणे ही आमच्यासाठी एक अद्वितीय आणि प्रेरणादायी अनुभव होता. त्यांच्या शैलीमध्ये प्रामाणिकपणा, तीव्र भावना आणि कलात्मक स्वातंत्र्य यांचा सुंदर समन्वय आहे, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 'निशांची' हा चित्रपट रहस्य, प्रेम, संघर्ष आणि गुंतागुंतीच्या पात्रांनी भरलेला आहे.  आमचा दृढ विश्वास आहे की थियेट्रिकल चित्रपटांचे भविष्य उज्वल आहे आणि 'निशांची' हा या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही पुढील काही वर्षांत आणखी अनेक उत्कृष्ट चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित करणार आहोत, आणि आम्हाला अभिमान आहे की 'निशांची' ही आमच्या या प्रवासाची एक प्रभावी सुरुवात आहे. या चित्रपटातील संगीत देखील अप्रतिम असून, अनुराग कश्यप यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना आहे."

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले,  “'निशांची' ची कथा आम्ही २०१६ साली लिहिली होती आणि तेव्हापासून मी या चित्रपटाला त्याच्या मूळ रुपात साकारू इच्छित होतो. मला एक असा स्टुडिओ हवा होता ज्यांना माझ्यावर आणि माझ्या दृष्टीकोनावर पूर्ण विश्वास असेल. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ही संधी दिली आणि माझ्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले.  ही कथा मानवी भावना, प्रेम, लैंगिकता, सत्ता, गुन्हा, शिक्षा, फसवणूक आणि पश्चात्ताप यांचा विलक्षण संगम आहे. मला माझ्या टीमचा खूप अभिमान वाटतो – कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते – ज्यांनी ही कथा पडद्यावर जिवंत केली.  अमेझॉन एमजीएम स्टुडिओजसोबतचा हा अनुभव माझ्या फिल्ममेकिंगच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारा ठरला. आम्ही सगळे खूप उत्साहित आहोत आणि थोडेसे गोंधळलेलेही, पण प्रेक्षकांपर्यंत 'निशांची' पोहोचवण्यासाठी आतुरतेने १९ सप्टेंबरची वाट पाहत आहोत.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K