गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा

गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा

शिवोली, १८ जून २०२५- गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला, शिवोली सांजाव पारंपारिक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने २४ जून २०२५ रोजी शिवोलीत सांजाव २०२५ साजरा करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा बहुप्रतिक्षित सांस्कृतिक उत्सव शिवोली या चैतन्यशील नदीकाठच्या गावात सेंट अँथनी चर्चसमोर होणार असून तो परंपरा, रंग आणि सामुदायिक भावनेने भरलेल्या मौजेचे आश्वासन देतो. 

यंदाच्या उत्सवात माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे; माननीय मत्स्योद्योग मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर; जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश सी. गावकर; आमदार, शिवोली मतदारसंघ, डिलायला लोबो; आमदार, कळंगुट मतदारसंघ, श्री मायकल लोबो; सचिव पर्यटन, श्री संजीव आहुजा, आयएएस; पर्यटन संचालक, श्री केदार ए. नाईक; व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी श्री कुलदीप आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना पर्यटन संचालक श्री केदार ए. नाईक म्हणाले, की “शिवोलीतील सांजाव हा गोव्याच्या केवळ उत्साही मान्सून संस्कृतीचा उत्सव नसून हा उत्सव समुदायांना एकत्र बांधणाऱ्या व खोलवर रुजलेल्या परंपरांची आपल्याला आठवण करून देतो. अशा उत्सवांद्वारे, आम्ही समुदाय-केंद्रित पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, जे स्थानिक ओळखीचा सन्मान करतात आणि पर्यटकांना आकर्षक अनुभव देतात.”

गोव्याच्या वारशात रुजलेला आणि अतुलनीय उत्साहाने साजरा केला जाणारा, शिवोलीतील सांजाव महोत्सव हा राज्यातील सर्वात विशिष्ट अश्या मान्सून उत्सवांपैकी एक आहे. या वर्षीचा उत्सव भव्य अश्या पारंपारिक बोट परेडने सुरू होईल, जिथे सुंदर सजावट केलेले फ्लोट्स आणि उत्सवी पोशाख परिधान करून  लोक सहभागी होतील. दरवर्षीप्रमाणे हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणारी पाण्यातून मनमोहक अशी मिरवणूक निघेल. गोवा पर्यटन देखील बोट परेडमध्ये एक खास डिझाइन केलेली बोट आणि मान्सून मास्कोटसह सहभागी होईल. त्यानंतर, या प्रसंगी खास तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित नृत्य सादरीकरण होईल.

या उत्सवात गोव्यातील पारंपारिक लोकनृत्ये आणि लाईव्ह संगीत देखील सादर केले जाईल, जे राज्यभरातील कलाकारांना एकत्र आणेल. सांस्कृतिक परंपरेचा एक भाग म्हणून, गोव्यातील सांजाव उत्सवांचा वारसा पुढे सुरु ठेवताना विहिरी आणि ओढ्यांमध्ये आनंदाने प्रतीकात्मक उडी घेतली जाईल.

या उत्सवातील इतर आकर्षणांमध्ये दीर्घकाळ चालत आलेले ओझे आणि धाली परंपरा, कोपेल स्पर्धा तसेच आधुनिक चैतन्यशीलतेसह उत्सवाच्या भावनेचे मिश्रण असलेले आकर्षक सादरीकरण समाविष्ट आहे. या वर्षी कार्यक्रमांच्या यादीमध्ये युवा बँड क्ले जार्सचे उत्साही सादरीकरण, जॉनी बी गुड आणि रेझा यांचा एक विशेष संगीतमय कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही तल्लीन करणारा अनुभव देताना, आमच्या समृद्ध व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रचार करण्याच्या गोवा पर्यटनाच्या वचनबद्धतेची पुष्टी देतो. उत्सवाच्या वातावरणात पारंपारिक रीतिरिवाजांवर प्रकाश टाकून समुदायांना एकत्र आणणे, चिरस्थायी आठवणी निर्माण करणे आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत करणे, हे या उत्सवाचे उद्दिष्ट आहे. 

शिवोलीत नदीकाठच्या आकर्षक निसर्गरम्य स्थळी परंपरा आणि एकतेच्या या गतिमान उत्सवात सहभागी होण्यासाठी जनतेला, पर्यटकांना आणि संस्कृतीप्रेमींना आमंत्रित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K