लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

लावणी कलावंत महासंघमुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५  मंगळवारदिनांक २४ जून२०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिरदादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

सदर सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेततर लावण्यवती प्रज्ञा कोळीशाहीर दत्ताराम म्हात्रेगायिका वंदना निकाळेपुरुष लावणी कलाकार आनंद साटमनिर्माते उदय साटमवादक धीरज गोरेगांवकरनृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशेनिवेदक भरत उतेकरलोककलेसाठी सुनिल ढगेनेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी - २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे...

तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे...

सदर सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहेअसे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K