एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स

एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्सतर्फे आर्थिक वर्ष 2024-25 करिता ₹176.32 कोटींच्या विक्रमी बोनसची घोषणासाल-दरसाल 31% वृद्धीची नोंद

मुंबई, 12 जून 2025: भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2024-25 च्या वार्षिक मूल्यांकनादरम्यान आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण 176.32 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या बोनस घोषणेचे सलग 11 वे वर्ष असून हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. यंदा मागील आर्थिक वर्षाच्या 134.44 कोटी रुपयांच्या एकूण बोनसच्या तुलनेत 31% वाढ झाल्याचे दिसते. या एकूण बोनस 176.32 कोटींपैकी 53.43 कोटी रुपये पात्र पॉलिसीधारकांना रोख बोनस आणि परिपक्वता बोनसच्या स्वरूपात वितरित केले जातीलआर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उर्वरित रक्कम पॉलिसीची परिपक्वतासरेंडर/समर्पण किंवा अकाली मृत्यू झाल्यावर दिली जाईल.

बोनसमध्ये रिव्हर्शनरीकॅश आणि टर्मिनल बोनसचा समावेश असून पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या सहभागी योजनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये दिले जातात.

आर्थिक वर्ष 2024-25 साठी सर्व प्रीमियम पेमेंट अटींमध्ये लोकप्रिय सुपर कॅश प्लॅन अंतर्गत कॅश बोनसमध्ये 0.10% वाढ करण्यात आली आहे. पॉलिसीच्या कालावधीत ग्राहकांना सुधारित तरलता प्रदान करण्यासाठी ही वाढ करण्यात आली. याव्यतिरिक्तनिवडक योजनांसाठी आकर्षक अंतिम बोनस जाहीर करणे सुरूच आहेज्यामुळे पॉलिसीधारकांना देण्यात येणाऱ्या दीर्घकालीन मूल्यात आणखी वाढ होते.

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी गौरव सेठ म्हणाले, "आर्थिक वर्ष 2024-25 करिता आमची विक्रमी बोनस घोषणा आमच्या पॉलिसीधारकांचा विश्वास आणि निष्ठा दर्शवते. विवेकपूर्ण निधी व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोनाद्वारेआम्ही सातत्याने मजबूत परतावा देण्याचे तसेच आमच्या ग्राहकांना कायमस्वरूपी आर्थिक सुरक्षा प्राप्त करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ग्राहकांना जाहीर झालेला बोनस म्हणजे आमच्यासोबत गुंतवणूक केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा आमचा मार्ग आहे ".

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2024-25 साठी सहभागी उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये रिव्हर्शनरी बोनस (आरबी) आणि कॅश बोनस (सीबी) दोन्हीत आगेकूच केली आहे. हे सुधारित बोनस दर त्यांच्या पॉलिसीधारकांना दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्याच्या दृष्टीने त्यांची सातत्यपूर्ण वचनबद्धता प्रतिबिंबित करतात. उत्पादन आणि पॉलिसीच्या मुदतीनुसार रिव्हर्सरी बोनसची श्रेणी हमी रकमेच्या 10% पर्यंत घोषित केली जातेतर रोख बोनस हमी रकमेच्या 1.90% पर्यंत जाते. हे बोनस 31 मार्च 2025 पर्यंत सर्व सक्रिय सहभागी पॉलिसींना लागू आहेत. सध्या कालबाह्य किंवा पेड-अप स्थितीत असलेल्या पॉलिसीदेखील घोषित बोनससाठी पात्र ठरू शकतातया पॉलिसी लागू असलेल्या अटी आणि नियमांनुसार पुनर्स्थापना (रिइंस्टेटमेंट)च्या अधीन आहेत.

आपल्या सातत्यपूर्ण बोनस घोषणांद्वारेकंपनी ग्राहकांच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीस आणि सुरक्षिततेला पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K