'पंचायत सीझन ४'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
'पंचायत सीझन ४'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित – फुलेरा गाव बनणार निवडणुकीचं रणांगण, २४ जूनपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंग सुरू
भारतातील सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक, प्राइम व्हिडिओने आज आपल्या प्रेक्षकांसमोर बहुप्रतिक्षित वेब सिरीज ‘पंचायत सीझन ४’ चा मजेदार आणि जोशपूर्ण ट्रेलर प्रदर्शित केला. द वायरल फीवर TVF निर्मित या सीझनचे लेखन चंदन कुमार यांनी केले आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक कुमार मिश्रा व अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे. २४ जून २०२५ पासून, 'पंचायत सीझन ४' भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
फुलेरा गावात रंगणार राजकीय रणसंग्राम
‘पंचायत’चा हा नवीन भाग काल्पनिक फुलेरा गावावर आधारित असून, यावेळी गावात सत्तासंघर्षाचे वातावरण आहे. मंजू देवी आणि क्रांती देवी आमनेसामने उभ्या असून गावात रॅली, भाषणं, घोषणा आणि एकमेकांवर टीका-टिप्पणीचा धडाका लागलेला आहे. ट्रेलरमध्ये गावाचे वातावरण अक्षरशः मेळ्यासारखे भासते – ढोल, नगारे आणि देसी प्रचार गाण्यांसह.
प्रिय कलाकारांची पुनरागमन आणि नवे ट्विस्ट
या सीझनमध्ये पुन्हा एकदा आपले आवडते कलाकार झळकणार आहेत – जीतेन्द्र कुमार (सचिव जी), नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवारआणि पंकज झा.
Comments
Post a Comment