अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते 'ऊत' चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न*

'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर 
अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते 'ऊत' चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून  या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या  निमित्ताने ही नवी जोडी  मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते  संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.  

यावेळी चित्रपटाला  शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशोपांडे  म्हणाले की,  ‘चित्रपट करणं हे कसब आहे. अनेकांची मेहनत यात असते. आज चित्रपटाला प्रेक्षक  नसताना  चित्रपट बनवण्याचं धाडस करणं कॊतुकास्पद आहे.  या चित्रपटासाठी  मला  विचारणा झाली होती पण काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्याचा माझा योग  जुळून आला नव्हता. पण आज या  चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते  झाले आणि  या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.  

याप्रसंगी बोलताना अभिनेता राज मिसाळ म्हणाले की, माझा बॅकस्टेज पासून सुरु झालेला प्रवास आज चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पोस्टर अनावरण सोहळ्याच्या वेळी चित्रपटातील झिंगनांग चिंगनांग लै भारी गं... या प्रेमगीताची खास झलक कलाकारांनी सादरीकरणातून उपस्थितांना दाखविली. वैभव जोशी यांनी  लिहिलेलं हे गाणं  जयदीप वैद्य यांनी  गायले आहे, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे आहे.

कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K