सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...

'सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार... सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. टीझरमध्ये झलक पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा अधिकाधिक रंगू लागली आहे. आता 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत ‘सकाळ तर होऊ द्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आजवर हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे. या चित्रपटातील सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोन कलावंतांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुणावणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी संपूर्ण समाज...