वॉल्वो ईएक्स 30 ची रुबाबात एन्ट्री: 39,99,000 रुपयांत प्री-रिजर्व्हची संधी

वॉल्वो ईएक्स 30 ची रुबाबात एन्ट्री: 39,99,000 रुपयांत प्री-रिजर्व्हची संधी 

- 39,99,000 रुपयांच्या विशेष किंमतीत आपली ईएक्स30 करा प्री-रिजर्व्ह, किंमत 19 अक्टूबर 2025 पर्यंत मान्य

- प्रॉडक्ट डिझाइनकरिता रेड डॉट अँवॉर्ड आणि वर्ल्ड अर्बन कार ऑफ द ईयर 2024 विजेती

मुंबई, 23 सप्टेंबर, 2025: आता प्रतीक्षा संपली. वॉल्वो कार इंडियातर्फे आज आपल्या बहुप्रतिक्षित वॉल्वो ईएक्स30च्या किंमतीची घोषणा करण्यत आली. हा ब्रॅंड सर्वाधिक सस्टेनेबल तसेच स्टाइलिश इलेक्ट्रिक कार म्हणून नावारुपाला आला आहे. 41,00,000 रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीसह ईएक्स30 लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या साह्याने प्रवास अगदी सुलभ करण्यासाठी तयार आहे. 

या सणासुदीच्या हंगामात, वॉल्वो कार इंडियाने आपल्या डीलर्ससह दिनांक 19 ऑक्टोबर 2025 पूर्वी प्री-रिजर्व्ह केलेल्या ग्राहकांना 39,99,000 रुपयांच्या विशेष किंमतीत ईएक्स30 बुक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. तरीच अधिक माहितीसाठी, ग्राहकांना त्यांच्या जवळच्या विक्रेत्याशी संपर्क साधता येईल. ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल आणि नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून डिलिव्हरी करण्यात येईल. 

यंदा सणासुदीच्या मोसमात वॉल्वो कार इंडिया आपले डीलर/ विक्रेत्यांसह एकत्र येऊन दिनांक 19 ऑक्टोबर, 2025 अगोदर प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना 39,99,000 रुपयांच्या विशेष किंमतीत ईएक्स30 बुकिंग संधी उपलब्ध करून आनंदाची लयलूट करते आहे. ही स्पेशल प्री-रिजर्व्ह किंमत मर्यादित वेळेकरिता असेल. अधिक माहितीकरिता ग्राहक आपल्या जवळच्या  विक्रेत्यांना संपर्क करू शकतात. ही कार पाच रंगांत उपलब्ध होईल तसेच हिची डिलिव्हरी नोव्हेंबर, 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. 

वॉल्वोचे हे तिसरे ईव्ही मॉडेल असून ते कंपनीच्या होसकोटे, बंगळुरू येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. प्रत्येक ईएक्स30 स्टँडर्ड ऑफर म्हणून 11 किलोवॅट चार्जरसह येईल. ईएक्स30 शाश्वत गतिशीलता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, भविष्यावर आधारित रचना आणि एकूण सुरक्षिततेसाठी वॉल्वोची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा म्हणाले, “भारतीय बाजारात वॉल्वो ईएक्स30 चांगल्या किंमतीत सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की हे मॉडेल ऊर्जा, रचना आणि शाश्वत आलिशान दिमाखाचे चाहते असलेल्या नवप्रवर्तक आणि यशस्वी लोकांच्या नवीन विभागात लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आकर्षक कामगिरी, विस्तारित श्रेणी, अत्याधुनिक रुबाब आणि सुलभ ऑनरशिप पॅकेजसह, ईएक्स30 आमच्या ग्राहकांना एक नवीन ईव्ही अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.”

वॉल्वोच्या लाइनअपमधील सर्वात शाश्वत (पर्यावरण अनुकूल) कार म्हणून, ईव्ही30 चे कार्बन उत्सर्जन हे वॉल्वोच्या आतापर्यंतच्या सर्व संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांपैकी सर्वात कमी आहे. आकर्षक आतील भाग डेनिम, पीईटी बाटल्या, अँल्युमिनियम आणि पीव्हीसी पाईप्ससह विविध पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून तयार केला आहे. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ईव्ही30 ला युरो एनसीएपी सुरक्षा चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. ईव्ही30 टक्कर टाळण्यासाठी इंटरसेक्शन ऑटो ब्रेक, डोअरिंग अपघातासाठी डोअर ओपनिंग अलर्ट आणि प्रगत सुरक्षित अंतराळ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्सचा वापर केला जातो.

हिच्या केबिनमध्ये पाच अँम्बिएंट लाइटिंग थीमसह आणि स्कॅन्डिनेव्हियन हवामान-प्रेरित ध्वनीसह एक तल्लख अनुभव देते. नवीन हारमन कार्डन साउंडबार संकल्पना 1040W अँम्पलीफायर आणि नऊ उच्च-कार्यक्षमता स्पीकर्ससह एक उत्कृष्ट सराउंड साउंड अनुभव देते. शिवाय 12.3 इंचाचा हाय-रिझोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला असून यात गुगल बिल्ट-इन, 5G कनेक्टिव्हिटी आणि ओव्हर द एअर (OTA) अपडेट्स देण्यात आले आहेत. त्याच्या उत्कृष्ट रचनेचे जागतिक स्तरावरही कौतुक झाले आहे. यामध्ये रेड डॉट पुरस्कारः बेस्ट ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट डिझाइन 2024 आणि वर्ल्ड अर्बन कार ऑफ द इयर 2024 यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.

ईएक्स30 मध्ये 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि वॉल बॉक्स चार्जर आहे. त्याच्या डिजिटल 'की' कार्यक्षमतेसह, कार सोयीची व्याख्या नव्याने रचते. एनएफसीचा वापर करून, केवळ कार्ड टॅप करून कार अनलॉक करणे शक्य आहे. वॉल्वो कार अँपवरील डिजिटल 'की' प्लसच्या मदतीने, तुमचा फोन देखील एक किल्ली म्हणून काम करतो, जो एक सोपा आणि स्मार्ट अनुभव देऊ करतो.

यामधील सुलभ ऑनरशिप पैकेजमध्ये समाविष्ट आहे: 

3 वर्षांची व्यापक कार वॉरंटी 

3 वर्षांचे वॉल्वो सर्विस पॅकेज

3 वर्षांचा रोडसाइड असिस्टन्स 

8 वर्षांची बॅटरी वारंटी 

डिजिटल सर्व्हिसेसकरिता 5 वर्षांचे सब्सक्रिप्शन (ज्याला आता ‘कनेक्ट प्लस’ म्हटले जाते)

1 वॉल बॉक्स चार्जर (11 वॅट), थर्ड पार्टी माध्यमातून

ईएक्स30 सिंगल मोटर - एक्सटेंडेड रेंजबद्दल 

कामगिरी तसेच वैशिष्ट्ये

पॉवर: 272 एचपी 

टॉर्क: 343 एनएम 

बॅटरी साइज: 69 किलोवॅट अवर 

बॅटरी टाइप: लिथियम-आयन 

रेंज (डब्ल्यूएलटीपी): 480 किलोमीटर 

एक्सलरेशन (0-100 किमी/ताशी): 5.3 सेकंद  

टॉप स्पीड: 180 किमी/ताशी

ट्रांसमिशन: रियर व्हील ड्राइव्हसह ऑटोमॅटीक गिअरबॉक्स 

बॅटरी वॉरंटी: 8 वर्षे/160,000 किलोमीटर

सुरक्षा आणि सपोर्ट सिस्टम 

सेफ स्पेस टेक्नोलॉजी आणि पोस्ट इम्पॅक्ट ब्रेकिंग

पायी चालणारे पादचारी तसेच सायकल चालकांना ओळखून ऑटो इमरजेंसी ब्रेक

ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग, ज्यामध्ये एसआयपीएस (साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन सिस्टम) आणि इनर-साइड ड्रायव्हर सीट एअरबॅग समाविष्ट आहे

लेन कीपिंग एड तसेच ब्लिस (ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टम)

अँडाप्टिव क्रूज कंट्रोल 

पार्किंग पायलट असिस्टन्स आणि 360° कॅमेरा

ऑटोब्रेकसोबत रियर क्रॉस ट्रैफिक अलर्ट

ऑनकमिंग लेन मिटिगेशन आणि ब्रेकिंगच्या माध्यमातून ऑनकमिंग मिटिगेशन 

इंटरसेक्शन ऑटोब्रेक 

इंटीरियर तसेच कम्फर्ट 

फिक्स्ड पॅनारोमिक सनरूफ 

इलेक्ट्रॉनिक 2-झोन क्लाइमेट कंट्रोल, एअर क्वालिटी सिस्टम और एयरबोर्न पार्टिकल मॅटर सेंसरसह 

पॉवर अँडजस्टेबल लुंबार सपोर्टसह पॉवर अँडजस्टेबल ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट 

40/60 स्प्लिटसह फोल्डिंग बॅकसीट 

फ्रंट स्टोरेज (फ्रंक): 7 लिटर 

रिअर स्टोरेज (बूट स्पेस): 318 लिटर 

वन पेडल ड्राईव्ह ऑप्शन 

5 अँम्बिएंट लाइटिंग थीम तसेच साउंड 

नॉर्डिको अपहोल्स्टरी 

टेलर्ड स्पोर्ट्स स्टीयरिंग व्हील (चारकोल) 

हारमन कार्डन प्रीमियम साउंड सिस्टम (9 स्पीकरसह 1040 वॅट)

12.3-इंच सेंटर कंसोल टच स्क्रीन डिस्प्ले 

गूगल बिल्ट-इन (गूगल असिस्टेंट, गूगल प्ले, गूगल मॅप्स) आणि अॅप्पल कारप्ले 

स्मार्टफोनकरिता इंडक्टिव चार्जिंग 

डिजिटल की प्लस आणि एनएफसी स्मार्ट कार्ड की 

लार्ज डोअर पॉकेट आणि रिअर फोन स्टोरेज 

स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंग 

एक्सटीरियर (बाह्य सजावट) आणि इतर वैशिष्ट्ये

अँक्टिव्ह हाय बीम आणि डे-रनिंग लाइट्ससोबत एलईडी हेडलाइट

पॉवर ऑपरेटेड टेलगेट 

समर टायर्ससह 19-इंच 5-स्पोक एयरो व्हील 

वॉल्वो कार अँप

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025