‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’चा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

 'आऊट आँफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' चा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न 

मुंबई,९ एप्रिल २०२६: मुंबईतील परळ येथील ITC Grand Central या पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

या सोहळ्याला महेश मांजरेकर, वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार, अजिंक्य राऊत, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अद्वयी, अभिजित रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल गणवीर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

या चित्रपटातून अभिनेता अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पोस्टरमधील त्यांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, कथानकाबद्दल कुतूहल निर्माण केले आहे. ‘पुस्तकी अभ्यासा’ पलीकडे जाऊन आयुष्याच्या खऱ्या परीक्षेला सामोरं जाण्याची प्रेरणादायी कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.

चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन मनोहराराव ढोकणे यांनी ‘AI क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे.

मोहित कुलकर्णी यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना स्वर दिले आहेत. छायांकन मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी केले असून, संकलन अनिल विठ्ठल थोरात यांनी केले आहे.

मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून, त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची साथ लाभली आहे.

‘अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक’ प्रस्तुत हा प्रेरणादायी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO