केपी फिल्म्स प्रस्तुत, गायक हर्षवर्धन वावरे यांनी ‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 केपी फिल्म्स प्रस्तुत, गायक हर्षवर्धन वावरे यांनी ‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘मी होणार सुपरस्टार’ फेम नृत्यांगना अपेक्षा लोंढे झळकणार नव्या डान्सिकल म्युझिक अल्बममध्ये
मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार गाणी सादर करणाऱ्या केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओकडून आता ‘बेबी लेट्स डान्स’ हे नवे डान्सिकल गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मौसम इश्काचा’, ‘बहिण लाडकी’, ‘साजनी’, ‘तुला पाहून मी’, ‘राधा बासरी’ आणि ‘मराठी रॅपर’ यांसारख्या गाण्यांनंतर आणखी एक हटके संकल्पना घेऊन ही टीम रसिकांसमोर येत आहे.

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ फेम नृत्यांगना अपेक्षा लोंढे यांचा आकर्षक डान्स परफॉर्मन्स. जय इथापे आणि समृद्धी काळे हे सहकलाकार देखील या गाण्यात झळकणार आहेत. नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्यामध्ये आधुनिक संगीत, जोशपूर्ण नृत्यरचना आणि स्टायलिश सादरीकरणाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे.

गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजाने सजलेल्या या गाण्याची संकल्पना किशन पटेल यांची असून गाण्याचे दिग्दर्शन स्वप्नील पाटील यांनी केले आहे. उत्कृष्ट संगीत, दमदार दृश्यरचना आणि उत्साहवर्धक सादरीकरणामुळे ‘बेबी लेट्स डान्स’ हे गाणे तरुणाईसह सर्व संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला असून हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO