मराठी रसिकांची 'घबाडकुंड'ला दमदार साथ

दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ८.१०कोटींची  कमाई ; तिसऱ्या आठवड्यात दिमाखदार वाटचाल

मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित असतानाही 'घबाडकुंड'ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा', 'देऊळ बंद', या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे 'कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा', 'वेलकम टू द जंगल' आणि हॉलिवूडमधील द ओडिसी', 'स्पायडर-मॅन' तसेच 'ऑब्सेशन' यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड' ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. 

दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.१०कोटींची कमाई करत यशाची नवी उंची गाठली असून, आता तिसऱ्या आठवड्यातही दिमाखदार वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड'ने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असून, तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटावरील प्रेक्षकांचे प्रेम कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील लेखन, दिग्दर्शन, दमदार कलाकारांचा अभिनय, प्रभावी संवाद, पार्श्वसंगीत, तांत्रिक मांडणी आणि उत्कंठावर्धक सादरीकरण या सर्वच बाबींचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. त्यामुळे 'घबाडकुंड'ची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र रंगताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यापासून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये शोची संख्या वाढवण्यात आली असून, अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे. कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत. टिकिटिंग प्लॅटफॉर्मवरही 'घबाडकुंड' ला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, सकारात्मक 'वर्ड ऑफ माऊथ'मुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रतिसाद केवळ एका चित्रपटाच्या यशापुरता मर्यादित नसून, मराठी चित्रपटांवर प्रेक्षकांचा वाढता विश्वास आणि दर्जेदार आशयाला मिळणारी दाद अधोरेखित करणारा आहे.

'आयकॉन द स्टाईल'चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित 'घबाडकुंड' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. रहस्य आणि थराराचा वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवला असून, तिसऱ्या आठवड्यातही 'घबाडकुंड'ची यशस्वी घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO