‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं

 दर्याभवानीसाठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं

चित्रपटाच्या यशासोबत कलाकार-तंत्रज्ञांच्या सुख-समाधानासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित दर्याभवानी चित्रपटाचा मुहूर्त एका अनोख्या आणि भावनिक क्षणाने पार पडला. शुभारंभाच्या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांनी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालत चित्रपटाच्या यशासोबतच दर्याभवानीशी जोडलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि टीम सदस्याच्या सुख-समाधानासाठी मनापासून प्रार्थना केली. या गाऱ्हाण्यात चित्रपटाच्या निर्मितीसाठी पडद्यामागे आणि पडद्यावर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले. संपूर्ण टीमच्या कल्याणासाठी केलेल्या या प्रार्थनेमुळे दर्याभवानीचित्रपटाचा मुहूर्त केवळ चित्रपटाच्या शुभारंभाचा सोहळा न राहता, एकजूट, कृतज्ञता आणि आपुलकीचा सुंदर क्षण ठरला.

दर्याभवानी हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली.

 

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी 'दर्याभवानी' चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार, सुरज सादमवार  यांनी केली असून, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.

 

मुहूर्ताच्या प्रसंगी कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ मोठ्या उत्साहात उपस्थित होते. पारंपरिक गाऱ्हाणं, कृतज्ञतेची भावना आणि सर्वांच्या भल्याची प्रार्थना अशा सकारात्मक वातावरणात दर्याभवानीच्या चित्रीकरणाच्या नव्या पर्वाला शुभारंभ झाला. फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदारआणि रणपति शिवरायया गाजलेल्या चित्रपटांनंतर श्री शिवराज अष्टकमालिकेतील सातवा चित्रपट म्हणून दर्याभवानीकडे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. आता या अनोख्या आणि भावनिक मुहूर्ताने चित्रपटाच्या भव्य प्रवासाची सुरुवातही तितकीच खास आणि संस्मरणीय ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी