नवीन एक्सपीरियन्स सेंटरव्दारे अँम्पिअरचा कल्याणमध्ये

नवीन एक्सपीरियन्स सेंटरव्दारे अँम्पिअरचा कल्याणमध्ये विस्तार

नवीन डीलरशिपमुळे ॲम्पिअरच्या 'बिल्ट फॉर भारत' (Built for Bharat) इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणीची उपलब्धता, विक्री आणि सेवेचा आधार अधिक बळकट होणार

कल्याण, ऑक्टोबर 2026: ॲम्पिअरने आज सर्वलीपाडा येथे ॲब गॅरेज प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन केले आणि त्याद्वारे कल्याणमधील आपली रिटेल आणि सेवा उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. नवीन ॲम्पिअर एक्सपीरियन्स सेंटर ग्राहकांना एकाच छताखाली विक्री आणि सेवेचा सर्वसमावेशक अनुभव देईल, ज्यामुळे या भागातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ आणि सोईस्कर होईल.

नवीन एक्सपीरियन्स सेंटरमध्ये ॲम्पिअरचा इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओ दाखवला जाईल, जो विविध प्रकारच्या मोबिलिटी आणि ग्राहक वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या पोर्टफोलिओच्या केंद्रस्थानी ॲम्पिअर नेक्सस EX+ आहे, जी नवीन शक्तिशाली 5 किलोवॅट मोटरद्वारे चालते आणि भारतातील काही सर्वात आव्हानात्मक भूप्रदेशांमधील तिची कामगिरी दर्शविणारे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहेत.

कुटुंबांसाठी आणि किमतीबाबत सावध असणाऱ्या ग्राहकांसाठी, मॅग्नस जीमॅक्स दैनंदिन उपयुक्तता, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि परवडणारी किंमत यांचा मेळ घालते, तर मॅग्नस निओची रचना एर्गोनॉमिक्स आणि शहरातील दैनंदिन आरामदायक राइडिंगवर लक्ष केंद्रित करून करण्यात आली आहे. नुकतीच लॉन्च झालेली ॲम्पिअर रिओ व्हायब, विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण रायडर्ससाठी पोर्टफोलिओचा विस्तार करते.

ॲम्पिअर नेक्सस EX+ आणि मॅग्नस जीमॅक्स हे इंटेलिपॅकद्वारे समर्थित 30+ इंटेलिजेंट फीचर्स असलेल्या व्हेरिएंट्समध्ये देखील उपलब्ध आहेत, जे रायडर्ससाठी कनेक्टेड, स्मार्ट तंत्रज्ञान आणतात. या पोर्टफोलिओला नेक्स्ट-जेन LFP बॅटरी तंत्रज्ञानाचा आणि 5 वर्षे/75,000 किमी पर्यंतच्या स्टँडर्ड बॅटरी वॉरंटीचा आधार आहे, जे इलेक्ट्रिक मोबिलिटीला विश्वासार्ह आणि सुलभ बनवण्यावर ॲम्पिअरच्या असलेल्या लक्ष्याला अधिक बळकटी देते.

भारतातील विविध प्रकारच्या रायडिंग परिस्थितींमध्ये केलेल्या प्रत्यक्ष अभियांत्रिकी आणि पडताळणीवर ॲम्पिअरचे ‘बिल्ट फॉर भारत’ हे तत्त्वज्ञान आधारित आहे. नेक्सस प्लॅटफॉर्मने कोल्ली टेकड्यांमधील 70 तीव्र वळणे पार करून आणि भारतातील सर्वात उंच मोटारयोग्य पर्वतीय खिंडींपैकी एक असलेल्या 13,200 फूट उंचीवरील शिपकी ला खिंडीपर्यंत पोहोचून आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतातील विविध रस्ते, भूप्रदेश आणि गतिशीलतेच्या गरजांसाठी तयार केलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सच्या विकासावर ॲम्पिअरचे लक्ष केंद्रित असल्याचे हे प्रवास दर्शवतात.

एक आधुनिक आणि संवादात्मक रिटेल डेस्टिनेशन म्हणून डिझाइन केलेले, नवीन ॲम्पिअर एक्सपीरियन्स सेंटर संभाव्य ग्राहकांना आरामदायक वातावरणात पोर्टफोलिओ पाहण्यास, प्रशिक्षित उत्पादन तज्ज्ञांशी संवाद साधण्यास, इलेक्ट्रिक मोबिलिटीचे फायदे समजून घेण्यास आणि माहितीपूर्ण खरेदीचे निर्णय घेण्यास सक्षम करेल.

नवीन डीलरशिपचे उद्घाटन हे, प्रमुख बाजारपेठांमध्ये ॲम्पिअरची रिटेल आणि सेवा उपस्थिती वाढवण्याच्या तसेच उत्पादने आणि मालकी सहाय्य ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्याच्या ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. कल्याणमधील ही नवीन सुरुवात म्हणजे स्थानिक ग्राहकांशी असलेला संवाद अधिक दृढ करण्याच्या आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीची उपलब्धता सुधारण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable