अनुपम रसायन या स्पेशालिटी केमिकल कंपनीचा 760 कोटी Rs.च्या आयपीओसाठी अर्ज

मुंबई24 डिसेंबर 2020: या सुरतस्थित कस्टम डेव्हलपमेंट अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंगवर भर देणाऱ्या स्पेशालिटी केमिकल कंपनीने एकूण 760 Rs.चा निधी उभारण्यासाठी नियामकांकडे आपला डीआरएचपी सादर केला आहेयातून जमा होणारा निधी मुख्यतकर्ज फेडण्यासाठी वापरला जाणार आहेडीआरएचपीमध्ये नमूद केल्यानुसारकर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फे कर्मचारी सवलतही लागू केली जाऊ शकते.

या कंपनीने 1984 मध्ये पारंपरिक उत्पादनांपासून आपली सुरुवात केली आणि आजघडीला या कंपनीने विविध पायऱ्यांमधील सिंथेसिस आणि गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया जसे की इथरीफिकेशनअॅसिलेशनसायक्लीझेशनडायोझोटिझेशन आणि हायड्रोलिसस इत्यादींचा समावेश असलेल्या स्पेशालिटी केमिकल्समध्ये स्वत:चे आगळे स्थान निर्माण केले आहे.  गुजरातस्थित 6 बहुउद्देशीय 15 उत्पादनकेंद्रांतून या कंपनीचे कामकाज चालतेयातील 4 केंद्रे सचिन येथील ख्यातनाम इंडस्ट्रीयल इस्टेट आणि अदानी हाजिरा बंदराच्या नजीकच्या भागात आहेत तर इतर दोन झगाडिया येथील प्रसिद्ध इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये आहेतसर्व केंद्रामधील एकूण क्षमता सुमारे 23396 मेट्रिक टन आहेयातील 6726 मेट्रिक टन क्षमता मार्च 2020 मध्ये झगाडिया युनिट 5 आणि सचिन युनिट च्या व्यावसायिकीकरणातून मिळवण्यात आली.

आपली आरअॅण्डडी क्षमता आणि पारदर्शक किमती यामुळे अॅग्रोकेमिकलपर्सनल केअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रासाठीच्या 'लाईफ सायन्सेसशी संबंधित स्पेशालिटी केमिकल्स'च्या पद्धतींमधील नाविन्यपूर्णता आणि विकाससाठी एकथांबा पर्याय बनणे कंपनीला शक्य झालेया क्षेत्रांचा आर्थिक वर्ष 20 मधील महसुलात 95.37 टक्के वाटा होता आणि पिगमेंट्स आणि पॉलिमर अॅडिटिव्हसमध्ये वापरल्या जाणाऱ्या "इतर स्पेशालिटी केमिकल्स"चा उर्वरित वाटा होताव्यावसायिक पातळीवर सातत्यपूर्ण रासायनिक तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या जगातील काही थोडक्या कंपन्यांमध्ये अनुपमचा समावेश होतोतसेच त्यांच्या ग्राहकांनी नेहमीच त्यांच्या नाविन्यक्षम क्षमतांचे कौतुक केले आहे आणि युरोपजपानयुनायटेड स्टेट्स आणि भारतातील सिंजेंटा एशिया पॅसिफिकसुमिटोमो केमिकल कंपनीयूपीएल लिमिटेड अशा क्लाएंट्ससोबत ते दीर्घकाळ व्यवसाय करत आहेत.

आर्थिक वर्ष 18 ते 20 याकाळात कंपनीचा महसूल 24.29 टक्के सीएजीआरइतका वाढला आणि आर्थिक वर्ष 20 साठी त्यांचा ईबीआयटीडीए 134.90 Rs. कोटी होताकोविड-19 च्या महासंकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतरही कंपनीचा सहामाही महसूल 30 सप्टेंबर 2019 मधील 234.40 Rs. कोटीच्या तुलनेत 30 सप्टेंबर 2020 मध्ये 355.12 Rs. कोटी इतका म्हणजेच  51.51 टक्के वाढला.

सध्या जागतिक मागणीच्या तुलनेत भारतीय स्पेशालिटी केमिकल विभाग फक्त 1-2 टक्के मागणी पुरी करतोत्यामुळे भारतातील स्पेशालिटी केमिकल उद्योगाला जागतिक स्पेशालिटी केमिकल विभागात प्रचंड वाढीच्या दिशेने प्रयत्न करायचे आहेतजगभरातील अंतिम वापरकर्ता उद्योगातील वाढत्या मागणीमुळे पुढील 5 वर्षांत हे क्षेत्र 10-11 टक्के सीएजीआर वाढ अनुभवेल असा अंदाज आहे. (स्रोतएफअॅण्डएस अहवाल)

या इश्यूसाठी अॅक्सिस कॅपिटलअॅम्बिट प्रायव्हेटआयआयएफएल सेक्युरिटीज आणि जेएम फायनान्शिअल यांची बँकर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..