सलाम बॉम्बे फाऊंडेशन
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या व्हर्च्युअल विभागीय स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षकांनी दाखवले तंबाखू नियंत्रण व पोषणाचे महत्त्व
कोविड-१९ महामारीदरम्यान व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये गरीब पार्श्वभूमी असलेल्या मुलांच्या इंटरनेट कनेक्टीव्हीटीसंदर्भात गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांना बक्षीसे म्हणून डेटा पॅक्स देण्यात आले
मुंबई, २१ डिसेंबर २०२०: ''मी माझ्या कामगिरीमध्ये निपुण होण्यासाठी किती अथक मेहनत घेतो, हे लोकांना माहित असेल, तर ते निश्चितच अचंबित करण्यासारखे नाही'' असे मायकेल अँजेलो त्यांच्या क्रिएशन्सबाबत म्हणाले होते, जे जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच कलेचा माध्यम म्हणून वापर करत सलाम बॉम्बे फाऊंडेशनने ''कोविड-१९ दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांद्वारे तंबाखू नियंत्रण व पोषणावरील नाविन्यपूर्ण उपक्रम''या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले.
हे अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरले, ज्यामुळे त्यांना बदलत्या जीवनशैलीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण विषय असलेल्या आरोग्यदायी राहणीमानाबाबत त्यांची मते व्यक्त करता आली. यंदा विभागीय कार्यक्रमाच्या १५व्या पर्वाचे व्हर्च्युअली आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचे साह्य व मार्गदर्शनांतर्गत हस्तकला, चित्रकला/पोस्टर्सच्या रूपात, तसेच सोलो ॲक्ट्स असलेल्या व्हिडिओच्या रूपात त्यांची प्रतिभा दाखवली. यंदा शिक्षकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. महामारीदरम्यान शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापनासाठी अवलंबलेल्या नवोन्मेष्कारी विचारांच्या आधारावर त्यांचे परीक्षण करण्यात आले.सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या प्रीव्हेन्टिव्ह हेल्थ प्रोग्रामच्या तरूण विद्यार्थ्यांनी पूर्णपणे कार्यक्रम आयोजित करण्यासोबत त्याचे व्यवस्थापन पाहिले. तरूणांकडून तरूणांसाठी आयोजित केल्या जाणा-या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे हे उत्तम उदाहरण होते. शनिवारी स्पर्धेची अंतिम फेरी होती, ज्यामध्ये १२० शाळांमधील ३०० विद्यार्थी व ४० शिक्षक चारही विभागांसाठी स्पर्धा करताना दिसण्यात आले. बीएमसी स्कूल चिल्ड्रेनचे हस्तकला शिक्षक श्री. योगेश कुराडे, मराठी व हिंदी नाट्य क्षेत्रातील अभिनेता व दिग्दर्शक श्री. धम्मरक्षित रणदिवे, मुंबई महानगरपालिकेमधील एनएसटी विभागाचे आर्ट सेंटर प्रमुख श्री. प्रमोद रघुनाथ महाजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला विभागाच्या प्रमुख श्रीमती सुवर्णा घैसास हे कार्यक्रमासाठी परीक्षक होते.
या कार्यक्रमाने 'धोक्याच्या कक्षेत' असलेल्या वंचित समुदायामधील विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांमधील त्यांची प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी दिली. विद्यार्थ्यांनी तंबाखू नियंत्रण व आरोग्यदायी आहारविषयक सवयींबाबत चर्चा केली आणि त्यांच्या अध्ययनामध्ये अधिक भर केली. तरूणांनी किेशोरवयीन मुलांमधील आरोग्यदायी सवयींशी संबंधित सकारात्मक परिणामांवर आधारित स्किट्स, गाणी, प्रेझेन्टेशन्स, पोस्टर्स व हस्तकलेच्या सोलो परफॉर्मन्सेसच्या माध्यमातून संदेशांचा प्रसार केला. कोविडमुळे त्यांच्यासमोर आव्हाने असताना देखील माहिती जाणून घेण्याच्या आणि संकल्प करण्याच्या उत्साहाने विद्यार्थ्यांना अशा भव्य निर्मिती व कामगिरी सादर करण्यास प्रेरित केले.
या कार्यक्रमाबाबत बोलताना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य व पोषण विभागाच्या उपाध्यक्षा श्रीम. त्शेअरिंग डी. भुटिया म्हणाल्या, ''बीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण आणि तंबाखू-मुक्त वातावरणाप्रती त्यांच्या अधिकाराबाबत त्यांची मते व्यक्त करण्यासाठी दिले जाणारे हे वार्षिक अनुभवात्मक व्यासपीठ आहे. यंदा महामारीच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला. पण, पोषणावरील फोकस कायम राहिला, जे या महामारीच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. कुपोषणाचे अनेक नकारात्मक परिणाम दिसण्यासोबत शैक्षणिक कामगिरी, तसेच शारीरिक व मानसिक विकासावर प्रतिकूल परिणाम दिसण्यात येतात. आमच्या विद्यार्थ्यांना याची जाणीव आहे. तसेच त्यांना इतरांना जागरूक करण्याच्या गरजेबाबत देखील माहित आहे. हा विभागीय कार्यक्रम त्यांच्यासाठी एक व्यासपीठ आहे, जेथे त्यांच्या आवाहनाला महत्त्व दिले जाते.''
काळाची गरज लक्षात घेऊन अंतिम विजेत्यांना बक्षीसे म्हणून डेटा पॅक्स देण्यात आले, ज्यामुळे त्यांना सध्याच्या काळात गरज बनलेल्या इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यकतांची पूर्तता करता येईल. मुलांना ऑनलाइन शिक्षण सत्रांना उपस्थित राहण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी इंटरनेटचा अभाव किंवा अपु-या डेटा पॅक्समुळे त्यांचे ऑनलाइन वर्ग चुकवत आहेत. देण्यात आलेले पहिले बक्षीस १ वर्षासाठी डेटा पॅक, तर दुसरे बक्षीस ६ महिन्यांसाठी डेटा पॅक आणि तिसरे बक्षीस ३ महिन्यांसाठी डेटा पॅक होते. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने #BridgeTheGapउपक्रम देखील सुरू केला आहे. हा उपक्रम काळाची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आला आहे. सध्या इंटरनेटचा वापर वाढला आहे, म्हणूनच फाऊंडेशनने ३ लाख रूपयांचा निधी उभारला आहे, जो १२०० डेटा पॅक्समध्ये बदलण्यात आला आहे.
Comments
Post a Comment