मार्टिन करतोय 'फनरलचित्रपटाचं प्रमोशन!

'जगू आनंदेनिघू आनंदेया टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा 'फनरलहा मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपटरूपात मांडली असूनसध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा... कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतोत्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं. त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाहीतर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूरी राहिल्याचं मानलं जातं. कावळा पिंडाला शिवण्यासाठी चातकासारखे आकाशाकडे डोळे लावून त्याची वाट पाहिली जाते आणि अखेर काव... काव... करत जेव्हा कावळा येऊन पिंडाला शिवतो तेव्हा दशक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. धर्मशास्त्रात अशुभ मानल्या जाणाऱ्या याच कावळ्याला सोबत घेऊन 'फनरलचित्रपटाचं प्रमोशन करण्याची अनोखी शक्कल चित्रपटाच्या निर्मात्यांनी लढवली आहे.

'फनरलचित्रपटातही एक कावळा आहेजो नायक साकारलेल्या आरोह वेलणकरला नेहमी भेटतो. आरोहही त्याला काही ना काही खायला देतो. आरोहनं चित्रपटात या कावळ्याचं नाव मार्टिन ठेवलं आहे. चित्रपटातील मार्टिन क्रो आता प्रेक्षकांच्याही भेटीगाठी घेत आहे. 'फनरल'च्या प्रमोशनसाठी एक भला मोठा कावळा बनवण्यात आला आहे. हा कावळा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही चर्चेचा विषय ठरला होता आणि इफ्फीमध्येही रेड कार्पेटवर चालूनही त्यांनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हाच मार्टिन सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना भेटतोय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण या कावळ्याला पाहून खुश होत असूनत्याच्या प्रेमात पडले आहेत. कावळ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. 'फनरल'च्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे.

माणूस आयुष्यभर खूप चिंता करत असतो. आयुष्य संपायला येतं तेव्हा बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्याचं जाणवतं. याच सर्व गोष्टींवर तिरकस शैलीत भाष्य करताना, कोणाच्याही भावना न दुखावता विनोदी पद्धतीनं वास्तववादी घटनांचं सादरीकरण 'फनरल' मध्ये करण्यात आलं आहे. यातील संवाद खूप अर्थपूर्ण असूनघराघरातील कथा सांगणारे आहेत. आरोह वेलणकरसंभाजी भगतप्रेमा साखरदांडेविजय केंकरे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन 'बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंटप्रस्तुत 'फनरल' चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..