संसदीय सदस्य विखे पाटील यांचाही ‘वाय’ला पाठिंबा

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय'हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. कलाकारांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करत, माझा पाठिंबा आहे ! आपला? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आता संसदेचे सदस्य सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’चे पोस्टर शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे ती ‘वाय’ नक्की आहे तरी काय, याची. 

मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ट सांगणारा 'वाय' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight