मुक्ताचा आक्रमक अंदाज ‘वाय’!

वाय' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीला

गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ' पाठिंबा ' दर्शविला, त्या ' वाय ' या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे. 

या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे,  या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच  सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट  मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ' हायपरलिंक ' हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..