‘शेर शिवराज’ आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध

ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध

मुंबई मूव्ही स्टुडिओराजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर यांची निर्मिती असलेलादिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शक भव्य मराठी सिनेमाचिन्मय मांडलेकर यांची प्रमुख भूमिकामृणाल कुलकर्णी आणि मुकेश ऋषी महत्त्वाच्या भूमिकेत

भारत आणि २४० देशांतील प्राइम सदस्यांना पहाता येणार ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज

प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित चित्रपट शृंखलेतील फर्जंदफत्तेशिकस्त आणि पावनखिंड यांच्यानंतरचा चौथा सिनेमा आहे. 

शेर शिवराज मध्ये शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि धाडसी प्रसंगाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आदिलशाहीच्या शासनाखाली चिरडून निघत होतातेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं असामान्य बुद्धीचातुर्य आणि धाडसाच्या जोरावर अफझलखानला नेस्तनाबूत केलं चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून  अभिनेता मुकेश ऋषी बलशाली अफझलखानाच्या भूमिकेत आहेत.

मुंबई मूव्ही स्टुडिओजचे निर्माते नितिन केणी म्हणाले, ‘जगभरातील प्रेक्षकांना शेर शिवराज उपलब्ध करून देण्यासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओसह भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहेथिएटरमध्ये प्रेक्षकांचं जसं प्रेम या सिनेमाला मिळालं तसंच इथेही मिळेल.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात महान राजांपैकी एक होते आणि त्यांचं आयुष्य अविस्मरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांनी भरलेलं आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओशी सहकार्य केल्याचा मला खूप आनंद होत आहेकारण त्यांच्या मदतीने आम्ही केवळ मराठी प्रेक्षकांपर्यंत नाहीतर जगभरातील इतिहास प्रेमींपर्यंत पोहोचू.

मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणीराजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडेतसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी शेर शिवराज चित्रपटाची निर्मिती केली आहे. चिन्मय मांडलेकर आणि मुकेश ऋषी यांच्याशिवाय चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णीअजय पूरकरवर्षा उसगांवकरसमीर धर्माधिकारीमृण्मयी देशपांडेअक्षय वाघमारेविक्रम गायकवाडआस्ताद काळेसुश्रूत मंकणीदीप्ती केतकरमाधवी निमकरईशा केसकरवैभव मांगलेरिशी सक्सेनानिखील लांजेकर हे कलाकार आहेत.  हा भव्य ऐतिहासिक सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून भारत आणि२४० देशांत उपलब्ध करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..