सुप्रसिद्ध गायिका 'सोनाली सोनावणे' हीने गायलेली पहिलीच लावणी ठरली हीट !

सोशल मीडियावर ट्रेंडीग सिंगर म्हणून प्रसिद्ध असणारी गोड गळ्याची गायिका 'सोनाली सोनावणे' हीच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. माझी बाय गो, मी नादखुळा, पिरतीचं गाव, पोरी तुझे नादानं अशी तीने गायलेली कित्येक गाणी ब-याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. नुकतचं 'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' या तिने गायलेल्या पहिल्याच लावणीने १० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तसंच ही लावणी सोशल मीडिया व ब-याच कार्यक्रमांमध्ये सादर केली जात आहे. तिच्या जादुई आवाजाच्या अनोख्या शैलीमुळे तिची पहिलीच लावणी तीच्या चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे, यात काही शंका नाही.

गायिका सोनाली सोनावणे तीच्या पहिल्या लावणीविषयी सांगते, "लहानपणापासून मी सुलोचना चव्हाण आणि सुरेखा पुणेकर यांच्या लावणी ऐकत आली आहे. सुरेखा पुणेकर स्वत: लावणी गाऊन नृत्य देखील करायच्या. त्यामुळे त्यांच्या नजाकत, अदाकारी, लहेजा याचं बारीक निरीक्षण मी लहानपणी करायचे. नुकतचं त्यांनी एका कार्यक्रमात हीच लावणी सादर केली होती. हे ऐकून फारचं भारी वाटलं. मला गायनासोबत नृत्याची देखिल आवड आहे. त्याचा फायदा मला ही लावणी गाताना झाला. 'अहो शेठ' ही माझी पहिलीच लावणी आहे. ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की मला एखादी लावणी गायची आहे. मी आधी नृत्य आणि गायन दोन्ही करायचे. मी शाळा, कॉलेजमध्ये असताना अनेक नृत्य आणि गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मी अनेक कार्यक्रमांमध्ये लावणीचे लाईव्ह परफॉर्मन्स देखील केले आहेत. जेव्हा मला कॉल आला की तुला एक लावणी गायची आहे. तेव्हा मी फार उत्सुक होते. ही लावणी ऐकता क्षणी मला ती आवडली."

सोनाली रेकॉर्डींगचा किस्सा सांगताना म्हणते, "लावणी गाणं हे फार कठीण आहे. कारण लावणी हा प्रकार वेगळा आहे. लावणी गाण्याची शैली वेगळी असते. कंम्पोझरला व्हाईस टेक्सचर कसा हवा आहे. गाण्याच्या हरकती कश्या पद्धतीच्या हव्यात हे सर्व मलाच पाहावं लागलं. मी रेकॉर्डींग रूममध्ये गेली तेव्हा मी फारच उत्सुक होते. आणि लावणी गाताना माझ्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली. खरंतर, रोमॅंटीक, मेलोडीअस अश्या वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायला मला खूप आवडतात. शिवाय ही माझी पहिली लावणी असल्याने मी प्रत्येक शब्द, ताल, सूर यांचा सारासार अभ्यास केला होता. मी गाणं रेकॉर्ड करून कंपोझरला पाठवलं. ते त्यांना फार आवडलं. पहिल्याच प्रयत्नात म्युझिक कंपोझर नसतानाही माझं गाणं त्यांना आवडलं. हीच माझ्यासाठी पोचपावती आहे. माझ्या पहिल्याच लावणीला रसिक प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतं. तुमचे प्रेम असेच कायम राहो. हीच सदिच्छा!!"

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025