महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

ऐतिहासिक चित्रपटांची परिभाषा बदलणारा महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला   

~छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी ट्रेलर समर्पित ~
गश्मीर महाजनीला लाभले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोनही भूमिका साकारण्याचे सौभाग्य

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध लेखकदिग्दर्शकअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचा जबरदस्त ट्रेलरछत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी समर्पित करण्यात आलाचित्रपटाच्या घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये या चित्रपटाची उत्कंठा निर्माण झाली होतीनुकत्याच प्रदर्शित झालेल्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या "हंबीर तू..." या गाण्याने ती अजून वाढली तर आता "सरसेनापती हंबीररावच्या या जबरदस्त ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. "परिस्थिती जेवढी बिकटमराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाहीफक्त तो दागिना छातीवर पाहिजेअसे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची झलक पाहायला मिळत आहेमहाराष्ट्राचा महासिनेमाची ही छोटीसी झलक पाहूनच चित्रपटाची भव्यता लक्षात येते आहेमराठीत आजपर्यंत पाहायला  मिळालेले अनेक कलाकारांचा समावेश असलेले अंगावर रोमांच उभे करणारे लढाईचे प्रसंगस्फूर्ती देणारे संवाद आणि महेश लिमये यांचे चित्तथरारक छायांकन यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाला 'महाराष्ट्राचा महासिनेमाका म्हणतातहे कळते.

या ट्रेलर मधून "मी आता औरंगजेबाला इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणारअसे म्हणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे आक्रामक रौद्र रूप पाहायला मिळत असून "तुमच्या सारखा मामा प्रत्येकाला मिळोअशा संवादातून त्यांचे आणि सरसेनापती हंबीरराव यांचे एक हळवे नातेसुद्धा पाहायला मिळणार असल्याचे दिसतेछत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहेया आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा गश्मीर साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होतेत्यामुळे त्याला दोनही छत्रपतींच्या भूमिकेत बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. "आज आपला भगवा मातीत नाहीगनिमाच्या छातीत रोवायचाअसा हुंकार देणारे सरसेनापती हंबीरराव ही मुख्यभूमिका प्रविण तरडे यांनी साकारली आहे.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुतउर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटीलसौजन्य निकमधर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या काही दिवसात म्हणजेच  27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीररावचा ट्रेलर पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा :

https://www.youtube.com/watch?v=r2MjcRjnll0

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..