सानिकाचा खोटारडेपणा येणार सगळ्यांसमोर

मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दिपू आणि इंद्राची जोडी आणि त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतेय. कथेत जर खलनायक असेल तर त्याची रंजकता अजूनच वाढते. या मालिकेच्या कथानकात सध्या सानिका आणि कार्तिक हे नरकात्मक भूमिकेत दिसत आहेत. सानिका आपल्या फायद्यासाठी प्रेग्नन्ट असल्याचं नाटक करते पण तिचं हेच खोटं आता सगळ्यांसमोर येणार आहे. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि देशपांडे सरांच्या घरी असलेल्या पूजेला सानिका आणि कार्तिक येतात आणि सानिका पपई खाते. त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जायची लगबग सुरु होतो. सानिका डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार देत असते पण तिचं न ऐकता दिपू तिला डॉक्टर कडे घेऊन जाते. डॉक्टरकडे गेल्यावर दिपूला कळतं कि सानिका प्रेग्नन्ट नाही आहे. पण ती घरी हि गोष्ट सांगत नाही. पण सानिकाची चोर ओटी भरत असताना तिला काही मोठं गिफ्ट माहेरून मिळालं नाही म्हणून ती तमाशा करते. तिचा तमाशा खूप वेळ सहन केल्यावर दिपू सगळ्यांना खरं काय आहे ते सांगते. सानिकाचा खोटारडेपणा आल्यावर तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight