"उंच माझा झोका" पुरस्काराच्या सन्मानीय मानकरी..

 "उंच माझा झोका" पुरस्काराच्या सन्मानीय मानकरी.

झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. ह्या वर्षी देखील  मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून  "उंच माझा झोका" या  नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे . 'उंच माझा झोका' पुरस्काराचे यंदाचं हे आठव वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ह्या वर्षीचा हा सन्मान पुरस्कार विजत्या आहेत उद्योजिका - डॉ.वैजयंती पंडित आणि श्रीमती शीला धारिया ह्या सुप्रसिद्ध उद्योजिका असून त्यांनी  आपापल्या श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मूक बधिरांच्या कल्याणासाठी "संवाद कर्णबधीर प्रभोधिनी" शाळेच्या संस्थापिका  श्रीमती अपर्णा अगाशे, पर्यावरण आणि सौरऊर्जा यावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ.विनिता आपटे, डॉ. प्राजक्ता दांडेकर या शास्त्रज्ञ असून पशु विषयी त्यांना कणव असल्या मूळे  कृत्रिम शरीर तयार करण्या विषयी  त्यांचे संशोधन चालू आहे, सौ. ममता भांगरे यांनी शेती विषयी आधुनिक तंत्र वापरून शेती मध्ये त्यांनी अनेक कामे केली आहेत आणि श्रीमती मीनाक्षी निकम यांनी अपंग महिलांना सक्षम करण्यासाठी  'स्वयंदीप' ह्या संस्थाची स्थापन केलेली आहे, ऍथलेटिक्स मध्ये प्राविण्य मिळवून अनेक स्पर्धा यशस्वीरित्या    गाजवणाऱ्या श्रीमती संजीवनी जाधव या सर्व आदरणीय महिला या पुरस्काराच्या मानकरी आहेत . 

या सोहोळ्यात  कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका "उंच माझा झोका" पुरस्कार २०२२ झी मराठी वर २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ :०० वाजता.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..