सातारा आणि कोल्हापूर मध्ये रंगला भव्य रॅली सोहोळा

 सातारा आणि कोल्हापूर मध्ये आमच्या अप्पीची शान !

झी मराठीवर २२ऑगस्टपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्याभेटीला आली,'अप्पी आमची कलेक्टर'ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे.अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पीहीती मुलगी आहे जी खेडे गावात रहातेजिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीततिला कुठले मार्गदर्शन नाहीपण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे.तिला येणाऱ्या आर्थिक,शैक्षणिक आणि  सामाजिक अडचणींवर मातकरुन ती कलेक्टर होते.अशी ही संघर्ष कथा आहे.

ह्या प्रेरणात्मक मालिकेचे लेखन अभयसिंग जाधव ह्यांचे असूनदिग्दर्शन आशुतोष बाविस्कर ह्यांचे आहे.ह्या मालिकेत शिवानी नाईक सोबत रोहित परशुराम प्रमुख भूमिकेत असणार आहे.

सातारा आणि कोल्हापूर येथे"अप्पी आमची कलेक्टर"या मालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने रॅलीच आयोजन करण्यात आले होते.ह्या रॅली साठी पत्रकारांनी,सातारकरांनी  कोल्हापूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.ह्या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि आपली सगळ्यांची लाडकी शिवानी नाईक (अप्पीह्या दोघीनी दणक्यात ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेशिवानी नाईक ही उत्कृष्ट ढोलवादन करते.

सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये मालिकेच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी(कलेक्टर)मान.श्री रुचेश जयवंशी,अप्पी शिवानी नाईक,बापू-संतोष पाटील  तसेच मालिकेचे निर्माते श्वेता शिंदेसंजय खांबे आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीने उपप्राचार्या शेख मॅडम  विद्यार्थी उपस्थित होतेयावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कलाकारांनी आपले अनुभव व्यक्त केले.यानंतर प्रश्नोत्तराचा सुद्धा तास झाला ,यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअरकडे कसे पाहावे याबद्दल चर्चा करण्यात आलीसदर मालिका २२ ऑगस्ट पासून संध्याकाळी :00 वाजता , सोमवार ते शनिवार प्रदर्शित होणार असून या मालिकेचे चित्रण सातारा आणि आसपास च्या गावात होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..