ड्युरँड कप...

ड्युरँड कपमधील उंचावलेल्या कामगिरीनंतर नेमिलचे लक्ष्य एफसी गोवाच्या फर्स्ट टीमकडून जास्तीत जास्त सामने खेळण्याचे 
 
२३ ऑगस्ट, २०२२: ड्युरँड कपमधील उंचावलेल्या कामगिरीनंतर स्टार खेळाडू मुहम्मद नेमिल याने एफसी गोवाच्या फर्स्ट टीमकडून जास्तीत जास्त सामने खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एफसी गोवा क्लबने दोन वर्षांपूर्वी नेमिल या प्रतिभावंत खेळाडूला करारबद्ध केले. रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्सच्या (आरएफवायसी) प्रोग्राममधील एक फाइंड आहे. २०१५मध्ये तो आरएफवायसीमध्ये दाखल झाला त्यावेळी केवळ १५ वर्षांचा होता. युवा फुटबॉल क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नेमिल हा गोवा एफसीशी करारबद्ध झाल्यानंतर त्याचा खेळ अधिकच बहरला. 

करारबद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी नेमिल याने गोवा स्थित एफसीची सांघिक कामगिरी उंचावण्यात मोठे योगदान देत स्वतःचा ठसा उमटवला. त्यात ड्युरँड कप स्पर्धेचा प्रामुख्याने उल्लेख लागेल. २०२१ ड्युरँड कप हा एफसी गोवा आणि त्यांच्या चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. त्यात नेमिल याचे मोठे योगदान राहिले. त्याने ६ सामन्यांत ४ गोल केले. गटवार साखळीमध्ये जमशेदपूर एफसीविरुद्ध त्याचा खेळ निर्णायक ठरला. सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर एफसी गोवाने पहिल्यांदा ड्युरँड कप उंचावला आणि नेमिल हीरो ठरला. 

यंदाही एफसी गोवा संघ ड्युरँड कप स्पर्धेत खेळत आहे. गतविजेते असल्याने त्यांच्याकडे ट्रॉफी राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यात नेमिल याच्यावर एफसी गोवा संघाची भिस्त आहे. पहिल्या दोन सामन्यांत तितकेच म्हणजे दोन गोल करताना नेमिल याने सातत्य राखले आहे. सलामीला गोवा क्लबला मोहमेडन एफसीकडून ३-१ अशी मात खावी लागली तरी गतविजेत्यांचा एकमेव गोल हा नेमिलचा आहे. त्याने डाव्या कॉर्नरवरून अप्रतिम गोल करताना गौर्सना  पूर्वार्धात आघाडी मिळवून दिली. मात्र, एफसी गोवा संघाला आघाडी राखता आली नाही. त्यानंतर इंडियन एअर फोर्स टीमविरुद्ध नेमिल हा क्लबच्या मदतीला धावून आला. त्याने आठव्या मिनिटाला केलेला गोल एफसी गोवाला पहिला विजय मिळवून देण्यास पुरेसा ठरला. 

२०२१ ड्युरँड कपमधील चमकदार कामगिरीनंतरही २०२१-२२ आयएसएल हंगामात नेमिल याने गोवा एफसीला काही सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करण्यात मोलाचे योगदान दिले. मात्र, दुखापतीमुळे तो पूर्ण क्षमतेने खेळू शकला नाही. आयएसएलमधील १४ सामन्यांत नेमिल हा केवळ ३६२ मिनिटे मैदानावर उपस्थित राहू शकला. त्यात २११ वेळा चेंडूला स्पर्श करू शकला. तरीही चेंडू पास करण्याची त्याची ७७.९८ टक्के अचूकता प्रशंसनीय आहे. 

आयएसएलमध्ये चार सामन्यांत स्टार्ट करू शकलो तरी मी निराश नाही. मी अनेक सर्वोत्तम खेळाडूंसोबत सराव केला आहे. आजही अनेक सभोवती आहेत. त्यामुळे चांगला खेळ करण्याची कायम प्रेरणा मिळते. एफसी गोवा क्लबचे प्रतिनिधित्व करताना कायम मोठी संधी दिली जात असल्याबद्दल मी क्लब व्यवस्थापनाचा आभारी आहे. कुठल्याही स्तरावर क्लबचे प्रतिनिधित्व करताना चांगल्या कामगिरीला माझे प्राधान्य असते आणि राहील. ड्युरँड कप स्पर्धा संपल्यावर आगामी आयएसएल हंगामात गौर्सच्या फर्स्ट टीममधून जास्तीतजास्त सामने खेळायला मिळतील, असा मला विश्वास वाटतो. नवे प्रशिक्षक कार्लोस पेना यांच्या मार्गदर्शनाखाली मी खेळण्यास प्रचंड उत्सुक आहे. त्यातच अल्वेरो व्हॅझकेज, इकेर ग्वारॉटक्झेना, नोह सदाओगी तसेच इडू बेडिया, ब्रँडन फर्नांडेस, ग्लॅन मार्टीनस आणि अन्य खेळाडूंसोबत खेळता येणार असल्याने मी भारावलो आहे, असे मुहम्मद नेमिल याने पुढे म्हटले.  

सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी माझा खेळ उपयोगी ठरला, याचा आनंद वाटतो. मोहमेडनविरुद्ध चेंडूवर ताबा मिळवल्यानंतर माझ्या लक्षात आले की, प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर हा एका बाजूला आहे. गोल करण्याची संधी होती. चांगला प्लॅन करत मी संधीचे सोने केले. माझ्या गोलमुळे आघाडी मिळाली तरी संघ पराभूत झाल्याने निराश झालो. एअर फोर्सविरुद्ध माझा गोल सामना जिंकून देणारा ठरला. त्यावेळी मला लालरेमृआता एचपी आणि मेवेन दास यांची चांगली साथ लाभली. मेवेन याच्या सुरेख पासने माझे काम सोपे झाले. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..