मागील 5 वर्षांपासून लहान मुलं आणि तरूण प्रौढात उच्च मायोपिआ प्रकरणांत वाढ

मागील 5 वर्षापासून लहान मुलं आणि तरुण प्रौढात उच्च मायोपिआ प्रकरणांत वाढ

लेन्स प्रत्यारोपणाच्या साह्याने सहज उपचार शक्य: डॉ नीता शहा

मुंबई, 19 सप्टेंबर 2022: मागील 5 वर्षांमध्ये लहान मुलं आणि तरूण प्रौढात उच्च मायोपिआ प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटलच्या प्रमुख – क्लिनिकल सर्विसेस, चेंबूर, मुंबईच्या डॉ नीता शहा यांनी सांगितले.

“डोळ्यांच्या फार जवळून उपकरण हाताळणे, घराबाहेर जाणं टाळणे, पोषणविषयक घटक इत्यादी घटकांमुळे अशा प्रकरणांत वाढ होते. कोविड अगदी शिखरावर असताना तरूणांपासून वृद्ध व्यक्तिंत घराबाहेर पडण्यावर नियंत्रण आलं आणि स्क्रीनटाईम वाढला. शालेय अभ्यास देखील फोनवरून सुरू झाला, कारण घरातील प्रत्येक मुलासाठी संगणक खरेदी करणे शक्य नव्हते. लोक मास्क वापरू लागल्याने डोळ्यांचा कोरडेपणा वाढला”, अशी माहिती डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटलच्या प्रमुख – क्लिनिकल सर्विसेस, चेंबूर, मुंबईच्या डॉ नीता शहा यांनी दिली.

डोळ्यांचा नंबर जास्त असणे (हाय मायोपीआ) सामान्यपणे डोळ्याच्या बुबुळाच्या लांबीचा अक्ष वाढल्याने होते. उच्च मायोपीआ सामान्यपणे मोबाईल फोन, टॅब्लेट इत्यादी उपकरणांच्या अतिरिक्त वापराने उदभवतो. रुग्णांमध्ये डोळ्यांच्या तपासणीत झालेले दुर्लक्ष आणि अनियमिततेमुळे प्रामुख्याने लहान मुलांत अपवर्तक शक्ति वाढल्याने नजरेची क्षमता प्रचंड वाढते. नियमित डोळ्यांचा चष्मा न वापरल्याने नंबरात वाढ झाल्याचे आढळते. 

डॉ. नीता शहा पुढे म्हणाल्या, “अपवर्तक अडथळा (रिफ्रेक्टीव्ह एरर) अधिक असल्यास फॅकिक इम्प्लान्टेबल लेन्स (फॅकिक आयओएल)च्या मदतीने सुधारणा शक्य आहे. विशिष्ट रुग्णाच्या डोळ्यानुसार फॅकिक आयओएल तयार केली जाते. ही प्रक्रिया वेदनारहित असून संपूर्णपणे परावर्तित प्रक्रिया आहे आणि सोपी शस्त्रक्रिया 5 मिनिटांची आहे. रुग्ण या प्रक्रियेनंतर झटपट बरा होतो. ही प्रक्रिया केल्यानंतर पुनर्उपचाराचा दर 1% हून कमी असतो, त्याला शून्य देखभाल लागते आणि उपचार अयशस्वी ठरण्याचा धोका अजिबात नसतो. जर रुग्णाच्या डोळ्यांचा नंबर अधिक असेल किंवा तो लेसिक, पीआरके, स्माईल इत्यादी अन्य रिफ्रेक्टीव्ह एरर करेक्शन तंत्राच्या दृष्टीने सक्षम नसल्यास सध्या हे सर्वाधिक पसंतीचे तंत्र मानले जाते आहे.”

ज्या व्यक्ति उच्च मायोपीआग्रस्त आहेत आणि ज्यांना चष्म्यापासून सुटका पाहिजे त्यांनी अपवर्तन अडथळा दुरूस्ती (रेफ्रेक्टीव्ह एरर करेक्शन) संबंधी विविध पर्याय समजून घेण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यानंतर रेफ्रेक्टीव्ह सर्जन यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन सुचवतील. रेफ्रेक्टीव्ह एररविषयक सुयोग्य प्रक्रिया आणि तंत्राच्या साह्याने दृष्टीदोष दूर करणे सहज शक्य होते. डोळ्यांची तपासणी आणि मोजमाप घेतल्यानंतर कोणती विशिष्ट प्रक्रिया रुग्णासाठी योग्य आहे, याचे मूल्यमापन करण्यात येते. रुग्णावर फॅकिक लेन्स किंवा लेझर प्रक्रिया, जी सुयोग्य ठरेल ती डॉक्टर सुचवतील.

अलीकडे फॅकिक आयओएल प्रक्रिया फारच प्रचलित असून अधिकाधिक रेफ्रेक्टीव्ह सर्जन आणि रुग्ण सर्वोत्तम आणि परिवर्तनशील परिणामांसाठी या प्रक्रियांचा अंगीकार करत आहेत. या प्रक्रियेचा सर्वसाधारण खर्च रु. 60 हजार ते रु. 1 लाख 40 हजार एवढा आहे. या प्रक्रियेत वापरण्यात येणारी प्रत्येक लेन्स भारतीय बनावटीची आहे की परदेशी यावर खर्च अवलंबून आहे. फॅकिक आयओएलद्वारे तुमच्या दृष्टीची क्षमता बऱ्याच अंशी सुधारते आणि ही प्रक्रिया भारतातील सर्वच प्रमुख रुग्णालये आणि दवाखान्यांत उपलब्ध आहे.

जर डोळ्यांचा नंबर -8 पेक्षा खाली असेल आणि कॉर्निया पातळ असल्यास रुग्ण लेसिक किंवा स्माईल तंत्रासाठी सक्षम ठरत नाही. आम्ही पीआरके (फोटो रेफ्रेक्टीव्ह केराटोटॉमी) करू शकतो.

पीआरके प्रक्रिया वेव्हलाईट ईएक्स 500 लेझरसह स्ट्रीमलाईट टेक्नॉलॉजीने शक्य आहे, ज्यामुळे स्पर्श, काटछेद, फ्लॅप, इंजेक्शनची आवश्यकता भासत नाही. सुरक्षित लेझर शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी चांगल्याप्रकारे सुधारू शकते.

तुमच्या अवतीभोवतीचे जग सहजतेने अनुभवण्याशिवाय सुंदर दुसरे काहीच नाही. दृष्टी अगदी मायनसपर्यंत अधू असल्यास हाय पॉवरची आवश्यकता असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम गुणवत्तेची नजर लाभू शकते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..