जश्न–ए–इश्कः सेलिब्रटिंग लव्ह
शबाना आझमी सादर करतील सौरेंद्रो – सौम्योजित यांच्या संगीत आणि कवितांनी भरलेली एक संध्या
प्रेम ह्या भावनेव्यतिरिक्त कदाचितच अन्य कुठली भावना असेल जिचे पैलू कलेच्या माध्यमातून इतक्या व्यापकपणे शोधले गेले असतील. ह्या संकल्पनेने पूर्व आणि पश्चिमेकडीलही अनेक कवींना प्रेरणा दिली आणि परिणामी असंख्य भाषांमध्ये कवितांच्या काही उत्कृष्ट कलाकृती निर्माण झाल्या. यांपैकी काहींना चाली लावण्यात आल्या असून त्या खूपच लोकप्रिय झाल्या आहेत.
सिनेसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील आपल्या उत्कृष्ट कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी ह्या टागोर, शेक्सपियर, रोझेट्टी, ब्राऊनिंग, आगा शाहिद अली आणि अन्य क्लासिकल तसेच नवकवींनी लिहिलेल्या सदाबहार प्रेम कवितांचे वाचन करतील. गाण्यासोबत कवितेची जुळवाजुळव करण्याचे संगीतमय सादरीकरण सौरेंद्रो (पियानो) आणि सौम्योजित (गायन संगीत) ह्या जोडीचे असेल. गाण्यांची निवड, प्रेमाच्या विविध रंगछटा शोधणे हे गझल, ठूमरी, गीत आणि फिल्मी गाण्यांमधून केले जाईल.
श्रीमती कृष्णा खटाऊ ह्यांच्या स्मरणार्थ
स्थळ – टाटा थिएटर
दिनांक आणि वेळ – 17 सप्टेंबर 2022, संध्याकाळी 6.30 वाजता
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://www.ncpamumbai.com/
Comments
Post a Comment