मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

       मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘तू फक्त हो म्हण’ असं ती सांगतेय. ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे? ती कोणाला ‘हो’ म्हणायला सांगतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, त्यासाठी तुम्हाला मोनालिसाचा तू फक्त हो म्हण हा आगामी मराठी चित्रपट पहावा लागेल. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 'एन एच स्टुडिओज ही भारतातील अग्रगण्य निर्मिती संस्था आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण या निर्मितीसंस्थेने केले आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.


आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा सांगते, संगीतमय प्रेमकथा असल्याने मला हा चित्रपट करायचा होता. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेम हे असतंच तरी त्या प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा यात पहायला मिळणार आहे. प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही ‘तू फक्त हो म्हण या चित्रपटात मांडण्यात आला आहे. अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत अभिनेता निखील वैरागर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला गणेश देशमुखतुकाराम बीडकरपुष्पा चौधरीसविता हांडेडॉ.गणेशकुमार पाटील, झोया खान आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

 

तू फक्त हो म्हण चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहे. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीतरचना लिहिल्या आहेत. भास्कर डाबेराव यांचे संगीत तर आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. रंगभूषा समीर कदम तर वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश पतंगे, पंकज बोरे यांचे आहे. कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन मधुरम सोलंकी तर संकलन आनंद.ए.सिंग यांचे आहे. साउंड डिझायनिंगची जबाबदारी दिनेश उचील, शंतनू आकेरकर यांनी सांभाळली आहे. सहनिर्माता एम.जे.एफ. लॉयन.प्रकाश मुंधडा तर कार्यकारी निर्माता रवीशंकर शर्मा, राहुल चव्हाण आहेत. मार्केटिंग हेडची जबाबदारी श्रद्धा हिरावत यांनी सांभाळली आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक रोहित निकाळे आहेत.

 

तू फक्त हो म्हण १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight