"ज्येष्ठालयी' जमतो मेळा...उत्साही ज्येष्ठ गणांचा...लोभसवाणा कार्यक्रम झाला...! "ओंजळीतील शब्दफुलांचा"

शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ - ज्येष्ठ 'ज्येष्ठालयी ' जमतो मेळा उत्साही ज्येष्ठ गणांचा लोभसवाणा कार्यक्रम झाला 

" ओंजळीतील शब्दफुलांचा "

शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ - ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वझिरा येथे आजच्या साप्ताहिक सभेत " ओंजळीतील शब्दफुले " हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे शिल्पकार होते ---
श्री.विजय जोशी
श्रीमती चैत्राली जोगळेकर
श्रीमती मानसी चापेकर
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे उपाध्यक्ष श्री चांदोरकर यांनी या त्रयींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघाच्या सहकार्यवाह श्रीमती अलका वठारकर यांनी तीन कवींचा परिचय करून दिला. व कार्यक्रमाची सुत्रं श्री.विजय जोशी यांचेकडे सोपवली.
श्री विजय जोशी, श्रीमती चैत्राली जोगळेकर व श्रीमती मानसी चापेकर यांनी विविध विषयांवरील व नवरसनिर्मिती करणाऱ्या बहारदार कविता सादर केल्या.काही कविता गायनातून रसिकांपर्यंत पोहोचवल्या.पावसाच्या कविता सादर होत असताना प्रत्यक्ष वरुणराजानेही हजेरी लावली. सासूबाईची  आरती, माहेर व आईवरील कविता ,शाळेमधली मधुरा फडके , माझं त्वांड‌ दिसता ही खास मालवणी भाषेतील कविता या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.तर काही कवितांनी भाववश केलं.
अशाप्रकारे एकामागून एक कविता तिघांच्या 'ओंजळीतून'रसिकांसमोर अर्पित होऊ लागल्या . त्यातील शब्द, भावना, भावार्थ, सादरीकरण,सेवून रसिक मायबाप तृप्त तृप्त झाले.
पाहुण्यांच्या आग्रहाखातर संघातील श्री वठारकर , चांदोरकर,गुरव ,वैद्य , श्रीमती वर्षा रेगे, तृप्ती सरदेसाई यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या उंचीकडे नेणाऱ्या एकामागून एक कविता सादर करुन शेवटी सादर केलेल्या " चला बोलूया आयुष्यावर काही नंतर " या कवितेने कळस गाठला.
श्रीमती अलका वठारकर यांनी त्यांचे आभारही तिथेच कविता रचून कवितेतून मानले.
हा पूर्ण कार्यक्रम श्री महाडीक यांनी आपल्या मोबाईलमध्ये तर श्री.चंद्रशेखर ठाकूर यांनी युट्युबमध्ये बंदिस्त केला.रसिक सभासदांची पूर्ण वेळ उपस्थिती व उत्स्फूर्तपणे दिलेली दाद हेच या कार्यक्रमाचे यशस्वी गमक होय. रसिकांपर्यंत योग्य आवाजात कार्यक्रम पोहोचविण्याची जबाबदारी श्री.फडके व श्री मानकामे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.
अशाप्रकारे एक उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न झाला. .समस्त ज्येष्ठालय सभासदांस आनंदमय करता झाला  ||

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..