प्रेक्षकांची आणि मालिकेची रेशीमगाठ जुळणार आता एका नवीन वेळेत
फ्रेंड आणि परी नेहा पुन्हा भेटणार पण एका नव्या वेळेत.
यश आणि नेहाची रेशीमगाठ आता नव्या वेळेत.
'दार उघड बये' या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शि झाला आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मिडीयावर शेयर केल्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत होती मग तो यशवर्धन, समीर असुदे, नेहा किंवा छोटी परी. पण अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले आणि सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
आता चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. या सगळ्यांची दखल घेत वाहिनीने आणि निर्मात्यांनी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतलाय, हो हे खरं आहे, प्रेक्षकांची आवडती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे, ही मालिका झी मराठीवर १९ सप्टेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी ६.३० वा. प्रसारित होणार आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी आपल्या भेटीला येतील संध्या. ६ वा
Comments
Post a Comment