क्लिनथॉन २०२२: दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशन...

क्लिनथॉन २०२२: दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशन यांनी गणपती विसर्जनानंतर मुंबईतील बीच क्लीन अप मोहिमेसाठी MCGM सोबत घेतला सहभाग!

एकंदरीत १० दिवसांचा गणेशोत्सव सोहळा हा चांगल्या पद्धतीने पार पडला. तथापि गणेशमूर्ती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसणारे दृश्य हे उदासीनतेचे दिसते कारण विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष आणि प्लास्टिक हे सारं काही किनाऱ्यावर जमा होते.

शहर नागरी प्राधिकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देतानागणपती विसर्जनानंतर शहरातील समुद्रकिनाऱ्यांच्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्याच्या प्रयत्नातश्रीमती.  अमृता फडणवीस (दिव्यज फाउंडेशनच्या) आणि भामला फाउंडेशनचे  संस्थापक आसिफ भामला यांनी१० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेमंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या उदात्त उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. त्याच सोबत या ठिकाणी बीएमसी आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहलमुंबईचे पोलीस आयुक्त श्री.  विवेक फणसाळकरश्रीमती. पूनम महाजनजुहूचे आमदार श्री अमीत साटम आणि महाराष्ट्र विधानसभेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांसाहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकारणाच्या क्षेत्रातील नामांकित नावांव्यतिरिक्तज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि परिणीती चोप्राअपारशक्ती खुराणा यांच्यासह काही उल्लेखनीय नावांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. विशेष म्हणजे २००० हून अधिक स्वयंसेवक या उदात्त हेतूसाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले.

याच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेल्या अमृता फडणवीस  त्यांचे मत व्यक्त करताना म्हणाल्या,

स्वतःला आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवणे ही मूलभूत गरज आहे आणि या बद्दलची शिकवण आपल्याला लहानपणापासून देण्यात आली आहे. स्वच्छतेचे धडे गिरवून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करणे हा एकमेव उपाय आहे. जेणेकरून आपण मातृ निसर्गाच्या संसाधनांचा पूर्ण आनंद घेऊ शकतो,  आपल्या मुलांना शुद्ध शांत पर्यावरण देऊ शकतो आणि सागरी जीवन निर्मल बनवू शकतो.

प्लॅस्टिकचे दीर्घकाळ विघटन होत नसल्यामुळेआपल्या अन्न आणि पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आधीच दिसून येत आहेत आणि जर हे थांबले नाही तर ते निसर्गासोबत आपल्यासाठी सुद्धा धोक्याचे आहे.

ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दुंगात्याचप्रमाणे आपण सुद्धा मनाशी घट्ट केलं पाहिजे कीना कचरा करुंगा ना करणे दुंगा.

तसं ही आपल्या भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते.

याच बरोबर उपस्थित भामला फाउंडेशनचे संस्थापक असिफ भामला यांनी सगळ्या नागरिकांचे कौतुक करताना म्हणाले कीस्वच्छता मोहीम राबवत असताजुहू समुद्रकिनाऱ्यावड येणाऱ्या आणि तिथे राहणाऱ्या सगळयाच नागरिकांनी अगदी रात्री पासून ते पहाटे पर्यंत ही किनारपट्टी साफ करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहेज्याचे त्यांना खूप कौतुक आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight