तेजस्वी प्रकाशचा बबली अंदाज..

           तेजस्वी प्रकाशचा बबली अंदाज

‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील तेजस्वीचा फर्स्ट लूक रिलीज

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मराठी रुपेरी पडदयावर आपला जलवा दाखवणार आहे. नुकताच आगामी मन कस्तुरी रे या चित्रपटातील तेजस्वीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. श्रुती’ असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. नितीन केणी यांच्या मुंबई मुव्ही स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या व्हिडीओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे झळकणार आहे. या दोघांची ‘लव्हेबल केमिस्ट्री’ आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे.

इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शनवेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे. तर यूएफओ सिने मिडिया नेटवर्क’ या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत. व्यवसायप्रमुख शौमिल शहा आहेत.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025