टाटा वन एमजी (Tata 1mg) द्वारे ग्रँड सेव्हिंग डेज (महाबचत दिवस)..

टाटा वन एमजी (Tata 1mg) द्वारे  ग्रँड सेव्हिंग डेज (महाबचत दिवस) देशातील सर्वात मोठा आरोग्य आणि निरोगीपणा सेल घोषित

• औषधे, लॅब चाचण्या, हेल्थकेअर उत्पादने आणि अन्य गोष्टींवर सर्वोत्तम ऑफर
• 2 लाख ब्रँड आकर्षक ऑफर्ससह या कार्यक्रमात सहभागी होतील
• टाटा वन एमजी (Tata 1mg) लॅब्सकडून एक '₹99 स्टोअर' ऑफर देखील असेल ज्या अंतर्गत थायरॉईड प्रोफाइल टोटल, मधुमेह स्क्रीनिंग आणि लिपिड प्रोफाइल फक्त ₹99 मध्ये उपलब्ध केले जातील
मुंबई, 15 सप्टेंबर 2022: देशातील आघाडीचे हेल्थकेअर डिजिटल प्लॅटफॉर्म, टाटा वन एमजी (Tata 1mg) ने देशभरातील प्रमुख सण साजरे होण्याच्या अगोदर आपल्या बहुप्रतिक्षित ग्रँड सेव्हिंग डेज (GSD) म्हणजेच महाबचत दिवस सेलची घोषणा केली आहे. हे 16 ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान 5 दिवसांसाठी आयोजित केले जाणार आहे.
5 दिवसांसाठी वर्षातून दोनदा आयोजित केलेल्या या सेलमुळे ग्राहकांना सर्व श्रेणींमध्ये आरोग्य सेवा ब्रँड्सवर आकर्षक ऑफर मिळतील. यामध्ये औषधे, आरोग्यसेवा उत्पादने, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि ई-सल्ले यांचा समावेश आहे. टाटा वन एमजी (Tata 1mg) ने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षक ऑफरचा लाभ मिळावा यासाठी डेटॉल, डाबर, हिमालय आणि यांसारख्या आघाडीच्या आणि लोकप्रिय ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे.
आजचे ग्राहक त्यांच्या आरोग्याबाबत एकात्मिक प्रकारच्या सेवांना अधिक महत्त्व देतात. अशा परिस्थितीत, ग्राहकांना महाबचत दिवस सेल अंतर्गत  टाटा वन एमजी (Tata 1mg) प्लॅटफॉर्मवर आरोग्याशी संबंधित उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी अनुभवता येईल. आपल्या फिटनेसविषयी सजग असलेल्या लोकांपासून आरोग्य आणि स्वास्थ्य यांच्याविषयी जागरूक असलेल्या, तसेच प्रिस्क्रिप्शनच्या आधारे औषधे खरेदी करणारे आणि काळजीवाहूंपर्यंत सर्व खरेदीदारांना २ लाख औषधे, हेल्थ ब्रॅण्ड्स, हेल्थ चेक-अप, लॅब टेस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर आकर्षक सूट मिळेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight