झी मराठीवर अनुभवुया लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास

लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान आता मालिकारूपात महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना !

झी मराठीवर अनुभवुया लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास 

झी मराठी वाहिनीचं गेल्या २ ३ वर्षांपासून प्रेक्षकांसोबत अतूट नातं आहे.  ही फक्त एक वाहिनी नसून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधून नेहमीच मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आपण पाहत आलो आहोत. बदल घडत नाही तो घडवावा लागतोया दिशेने सध्या झी मराठी वाहिनीचा प्रवास सुरू आहे. आणि हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहेते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं आजच्या काळाशी अगदी सुसंगत आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे, लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहेआणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहेलोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहेटिळकांचं राष्ट्रप्रेमत्यांचं करारी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं आहेत्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतोत्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीयसामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलंहे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहेआपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोतटिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावीअसे वाटण्याचा हा काळ आहेम्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेतटिळकांचा विवाहत्यांचे महाविद्यालयीन जीवनत्यांचे विविधांगी लेखनराजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतीलते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होतेघड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्याभूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहेतो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेलह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स  हे या मालिकेचे निर्मिते आहेत.  या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

ही मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाआपल्या भेटीस येत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

“Mother’s Day” was celebrated with Mommy Bloggers & their Kids..