गोदरेज इऑन वेल्वेट सिरीज वॉशिंग मशीनच्या नवीन प्रिमियम रेंजने..

 तुमच्या धुवायच्या कपड्यांना एक नवीन अनुभव द्या

गोदरेज इऑन वेल्वेट सिरीज वॉशिंग मशीनच्या नवीन प्रिमियम रेंजने

~झीरो प्रेशरफलेक्सि वॉशरोलर कोस्टर वॉशसुपर ड्राय अशा अनेक प्रगत गुण वैशिष्ठ्ये आणि तंत्रज्ञानाला शोभणाऱ्या मोहकतेसह

~ब्रॅंड चे त्यांच्या प्रिमियम विभागात ५०% वाढ मिळविण्याचे लक्ष्य

A picture containing text, floor, indoor, kitchen appliance

Description automatically generated

मुंबई२२ नोव्हेंबर,२०२२: गोदरेज समूहाची अग्रणी कंपनी ‘गोदरेज अँड बॉइस’ चे प्रमुख व्यवसाय यूनिटगोदरेज अपलायन्सेस ने त्यांच्या संपूर्ण ऑटोमेटिकटॉप लोडेडपंचतारांकित वॉशिंग मशीन च्या प्रिमियम श्रेणीतील इऑन वेल्वेट श्रेणीचा विस्तार केला आहे. आजच्या काळातले असे ग्राहक ज्यांना वेगळ्या प्रकारची मात्र ट्रेंडिंग वैशिष्ठ्ये असलेली उत्पादने हवी असतात त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

गोदरेज वॉशिंग मशीन ची इऑन वेल्वेट श्रेणी ही वेगवेगळ्या प्रगत वैशिष्ठ्यांनी भरलेली आहे. जसे:

·         फलेक्सि वॉश: ग्राहकांना हवे तसे संयोजन करता यावे यासाठी भिजवणेधुणेखळबळवणेपिळणे अशा वेगवेगळ्या २६ सानुकूलित पर्याय आणि कपड्यांचे प्रमाण आणि प्रकार यानुसार पाण्याची पातळी ठरविण्याची सोय असे सर्व प्रकारचे कपडे आणि डागांसाठी अत्यंत उपयुक्त धुण्याचे अनेक पर्याय उपलब्ध.

·         झीरो प्रेशर (०.०२ एम पी ए तंत्रज्ञान): कमी दाबामध्ये सुद्धा म्हणजे अगदी शून्याच्या जवळ दाब असेल तरीही ०.०२ एम पी ए या तंत्रज्ञानामुळे ही मशीन  काम करतेय आणि इतर मशीन पेक्षा ६०% अधिक वेगाने पाणी भरते. (विशिष्ट मॉडेलस् मध्ये केवळ).

·         रोलर कोस्टर वॉश: खास डिझाईन केलेले गुरुत्वाकर्षण ड्रम व सखोल ॲक्वा जेट पल्सेटर या तंत्रज्ञानामुळे या मशीन मध्ये कपड्यांना भरपूर पाण्याचा धो धो वर्षाव मिळतो आणि कपड्यांना अधिक जोरात खळबळवून हलवल्यामुळे   कपडे जास्त स्वच्छ धुतले जातात.

·         सुपर ड्राय: कपड्यातील उरलेले पाणी निघून जाण्यासाठी एक अतिरिक्त स्पिन सायकलचा पर्याय यात दिला आहेजे डेनिमच्या व जाड मोठ्या कपड्यांना उपयोगी आहे.

·         रेअर कंट्रोल पॅनल: नियंत्रण पॅनल हे मागच्याबाजूस असल्याने त्यामध्ये पाणी शिरत नाही आणि मशीन मध्ये बिघाड येत नाही.

·         टब क्लीन मोड: टब धुण्याच्या पर्यायामुळे टबलिंट फिल्टर, पल्सेटर आणि बॅलेन्सर रिंग पूर्णपणे स्वच्छ होते आणि जेणेकरून मशीनची व कपड्यांची स्वच्छता राखली जाते. 

गोदरेज समूहाची अग्रणी कंपनी ‘गोदरेज अँड बॉइस’ चे मुख्य व्यवसाय यूनिटगोदरेज अपलायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष श्री. कमल नंदी म्हणाले की,  आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये आणि भौगोलिक प्रदेशामध्ये आमच्या प्रिमियम विभागाची वाढ अनुभवत आहोत आणि पॅनडेमिक काळाच्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या एकूण योगदानामध्ये प्रिमियम चे योगदान दुप्पट होण्याची अपेक्षा करीत आहोत. ऑक्टोबर पर्यंतच्या डेटानुसारप्रिमियम ट्रेंड पुन्हा येत आहे. विशेष करून फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरस् आणि पूर्ण ऑटोमेटिक वॉशिंग मशीनमध्ये तर तो खूप झपाट्याने वाढत आहे. आमची नवीन इऑन वेल्वेट प्रिमियम श्रेणी ची वॉशिंग मशीन ग्राहकांच्या अधिक उत्तम कार्यक्षमता आणि जास्त सुंदर या दोन्ही मागण्यांना योग्य आहे.

            गोदरेज अपलायन्सेसच्या वॉशिंग मशीन विभागाचे प्रॉडक्ट ग्रुप हेड श्री. राजिंन्दर कौल म्हणाले की,  प्रिमियम विभागात या श्रेणीच्या वॉशिंग मशीन ला आणून आम्ही या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ५०% वाढीची अपेक्षा करीत आहोत. येत्या महिन्यांमध्ये आम्ही हे अजून अधिक क्षमता आणि उच्च तंत्रज्ञान जोडून अजून विस्तारीत करू.

            या वॉशिंग मशीनची ॲस्थेटिक रचना नवीन युगातील ऑटोमोबाइलस् मधून प्रेरित आहेत जसे  कर्व्हड टींटेड मजबूत काच, इन्टयूटीव्ह असे न दिसणारे हॅंडल, मेटालिक क्रोम गारनिशकपडे धुण्याचे साबण सहजतेने ठेवता येईल असा कप्पा असलेले मऊ झाकण इत्यादीपंचतारांकित असल्याने हे कमीत कमी वीज वापर आणि जास्त बचत करण्यास मदत करेल. ६.५ किलो७ किलो, ७.५ किलो या क्षमतेचे मशीन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. शिवाय हे मेटालिक ब्लॅक, सिल्वर ग्लेझऑटम रेडग्रॅफाइट ग्रे अशा वेगवेगळ्या रंगात आहेत. या वॉशिंग मशीनची किंमत रू. ३१,००० (एम आर पी ) पासून चालू होत असून याच्या  मोटारीवर १२ वर्षांची वॉरंटी  आणि ३ वर्षांची सर्व समावेशक  वॉरंटी देण्यात आली आहे. वॉशिंग मशीन ची गोदरेज इऑन वेल्वेट सिरीज ही सर्व रिटेल दुकानामध्ये आणि ॲमेझॉनफ्लिप कार्ट या ऑनलाइन शॉपिंग साईट वर उपलब्ध आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

“Mother’s Day” was celebrated with Mommy Bloggers & their Kids..