कोटक जनरल इन्शुरन्स आणत आहे Meter...

कोटक जनरल इन्शुरन्स आणत आहे Meter

Meter आहे खाजगी कार विमा ॲड-ऑन आता कॅशबॅकसह

वाहन चालवले जात नसेल तेव्हा खासगी कार विम्यावर कॅशबॅक देणारी भारतातील पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी

मुंबई, नोव्हेंबर 21, 2022: कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“कोटक जनरल इन्शुरन्स”) आज खासगी कार विमा पॉलिसीसह उपलब्ध असलेले आपले ॲड-ऑन Meter (switch on/switch off cover) बाजारात आणल्याची घोषणा केली. ही ॲड-ऑन सेवा बाजारात आणल्यामुळे, खासगी कार पॉलिसीवर ॲड-ऑनमार्फत कॅशबॅक देणारी कोटक जनरल इन्शुलन्स भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. 

Meter (switch-on/off) ॲड-ऑनचा पर्याय घेणाऱ्या ग्राहकांना प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेले कोटक Meter मोबाइल ॲप डाउनलोड करावे लागेल, यामुळे कारमालकांना केवळ एक बटन क्लिक करून त्यांच्या कार विमा वापरानुसार ON and OFF बदलण्याची मुभा मिळेल.

‘Meter’, ही प्रवासाशी संबंधित बोली भाषेतील संज्ञा असून, त्यामुळे वाहन वापरात असेल, तेव्हाच वाहन मालकाला विम्यासाठी पैसे द्यावे लागतील हा अर्थ ध्वनित होतो. मोबाइल ॲप्लिकेशनवरील ON and OFF फीचरमार्फत एक साधा बदल करून, ग्राहकाला अखंड 24 तासांच्या प्रत्येक अवधीसाठी एक दिवस ‘रिवॉर्ड’ म्हणून मिळू शकतो. वाहन वापरात नसेल, तेव्हा केवळ कव्हर बंद (टर्न ऑफ) करून ठेवणे अपेक्षित आहे. जमलेले रिवॉर्ड डेज रिडीम करून एकतर नूतनीकरण शुल्कात सवलत मिळवता येईल किंवा कॅशबॅक प्राप्त करता येईल. पॉलिसी कालावधी संपताना own Damage (OD) प्रीमियमच्या 40 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. 

कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सुरेश अगरवाल म्हणाले, "वापरावर आधारित विमा संरक्षणाची मागणी वाढत आहे, विशेषत: कोविड साथीच्या काळानंतर ही मागणी खूपच वाढली आहे. हायब्रिड (संमिश्र) व वर्क फ्रॉम होम (घरून काम करणे) धोरणे आणि त्याला इंधनाच्या वाढत्या किमती व महागाईची मिळालेली जोड यामुळे बहुतेक वाहनमालकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यांमध्ये बदल झाला आहे. यातूनच आम्हाला आमच्या कार विमा पॉलिसासाठी एक ग्राहककेंद्री ॲड-ऑन Switch On and Off फीचर आणण्याची प्रेरणा मिळाली. ‘Meter’ या नवीन तंत्रज्ञान केंद्रित विमा पॉलिसीच्या माध्यमातून आम्हाला सर्व ग्राहकांना योग्य सेवा द्यायची आहे आणि वाहन कमी प्रमाणात चालवणाऱ्या ग्राहकांना त्याचा मोबदला द्यायचा आहे. यामुळे ग्राहक राखून ठेवण्यात मदत होईल तसेच ग्राहकांचे ड्रायव्हिंगविषयक वर्तन समजून घेण्यासाठी व त्यांना सेवा देण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

“Mother’s Day” was celebrated with Mommy Bloggers & their Kids..