'पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित....

 'पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशीत्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला पिकोलो हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित करण्यात आला.  राजसाहेबांनी  चित्रपटाला  मनापासून शुभेच्छा दिल्यायाप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार उपस्थित होते.  फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित पिकोलो’ ह संगीतमय चित्रपट असून राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

पिकोलो मध्ये ही संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर  मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतोव त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतोहे पिकोलो मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतातहे पिकोलो चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत पिकोलो चित्रपटात किशोर चौघुलेअभय खडपकरदीक्षा पुरळकरनमिता गावकरपद्मा वेंगुर्लेकरविश्वजीत पालवमिलिंद गुरवहर्षद जाधव,  रघु जगतापरोहन जाधवहर्षद राऊळशुभम सुतारहर्षद परबविद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करणार आहे.

येत्या २६ जानेवारीला पिकोलो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Trailer  Link   - https://youtu.be/GLg5bX4_0d4

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..