मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित “महाराष्ट्र व्यापारी पेठ”
ठाण्यात प्रथमच
दि. २८ व २९ जानेवारी रोजी
“महाराष्ट्र व्यापारी पेठ”
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित ठाण्यात प्रथमच “महाराष्ट्र व्यापारी पेठ” चे आयोजन करण्यात आले आहे. गेली ४२ वर्षे मराठी व्यावसायिकांचं हित जपणारी तसेच नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन मार्गदर्शन करणारी “मराठी चेंबर ऑफ कॉमर्स” ही संस्था महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सतत “महाराष्ट्र व्यापारी पेठ” चे आयोजन करत आहे. ठाणे व मुंबईतील मराठी नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून तसेच त्यांच्या वस्तु किफायतशीर भावात ग्राहकांना मिळवून देणे या हेतूने ठाण्यात प्रथमच द ठाणा क्लब, मोहन कोपिकर रोड, तीन हात नाका फ्लाय ओव्हर, रहेजा गार्डन समोर, ठाणे येथे “महाराष्ट्र व्यापारी पेठ” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २८ जानेवारी व रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते ९ या दरम्यान सुरू होणार्या या “महाराष्ट्र व्यापारी पेठ” मध्ये ग्राहकांना ड्रेसेस, साड्या, फॉर्मल शर्टस, फॅब्रिक ज्वेलरी, ओक्सिडाइज ज्वेलरी, मसाले, गिफ्ट आर्टिकलस, हॅण्ड पेंटेड बॅग्स, पर्स, वारली पेंटिंग बॉक्सेस, आकर्षक पारंपरिक पितळी भांडी, सिल्व्हर गिफ्ट आर्टिकलस आणि बरच काही स्वस्त दरात खरेदी करता येईल. ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment