रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी एण्ड टीव्ही आणि मुंबई वाहतूक पोलिस आले एकत्र..
रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी एण्ड टीव्ही आणि मुंबई वाहतूक पोलीस आले एकत्र
~ लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या कलाकारांचे प्रवाशांना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहन ~
मुंबई, 16 जानेवारी 2023: दरवर्षी रस्ता सुरक्षा उपाय व नियमांबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा मुंबई वाहतूक पोलिस यांनी ११ ते १७ जानेवारी २०२३ दरम्यान राबवण्यात येणाऱ्या जागरूकता मोहिमेसाठी एण्ड टीव्हीसोबत सहयोग केला आहे. एण्ड टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय व लाडक्या भाभी अंगूरी (शुभांगी अत्रे) व अनिता (विदिशा श्रीवास्तव) अनेक रस्ता सुरक्षा उपायांबाबत जागरूकतेचा प्रसार करतील, जसे हेलमेट्स घालणे, सीटबेल्ट्स लावणे, मद्यपान करून गाडी चालवू नये. दोन्ही भाभींनी सार्वजनिक जागरूकता मोहिमेला सुरूवात केली, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मालिकेमधील व्यक्तिमत्त्वांच्या अनोख्या शैली, विशिष्टतेमध्ये वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाविषयी बोलताना सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. प्रविणकुमार पडवळ म्हणाले, ‘‘रस्ता सुरक्षा हे मुंबई वाहतूक पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि मुंबईच्या नागरिकांसाठी सुरक्षित रस्ते निर्माण करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. हा प्रयत्न सुरू ठेवत विविध सुरक्षा उपाय आणि वाहतूक उल्लंघनांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी एण्ड टीव्हीसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या लोकप्रिय पात्रांच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांवर त्यांच्या स्वत:साठी, तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षिततेला गांभीर्याने घेण्यास सकारात्मक प्रभाव पाडण्याची आशा करतो.’’
रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी मुंबई वाहतूक पोलिससोबत सहयोग करण्याबाबत एण्ड टीव्ही, झिंग, बिग मॅजिक व अनमोलचे चीफ क्लस्टर ऑफिसर विष्णू शंकर म्हणाले, ‘‘रस्ता सुरक्षेसंदर्भात मुंबई वाहतूक पोलिस नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत आणि त्यांच्या मोहिमा देखील उल्लेखनीय आहेत. एण्ड टीव्हीमध्ये आम्हाला रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आणि सहयोगाने आपले रस्ते व समुदायांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग करण्याचा सन्मान वाटतो. चाहत्यांच्या अत्यंत लाडक्या असलेल्या अंगूरी भाभी व अनिता भाभी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये मुंबईकरांना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना पाहायला मिळतील. मुंबईमध्ये ऑन-ग्राऊंड कॅम्पेनव्यतिरिक्त आम्ही मायक्रोसाइट विकसित केली आहे, जेथे देशभरातील लोक त्यांच्या प्रियजनांना वैयक्तिकृत रस्ता सुरक्षा व्हिडिओ पाठवू शकतात.’’
याबाबत मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अभिनेत्री शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्हणाल्या, ‘‘मला रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या मोहिमेचा भाग असण्याचा आनंद होत आहे. आपल्या स्वत:च्या जीवनासोबत इतरांचे जीवन धोक्यात टाकणे टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम माहित असणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. माझे चाहते andtvroadsafety.zee5.com या वेबसाइटवर क्लिक करू शकतात आणि त्यांच्या प्रियजनांना माझे सुरक्षा संदेश देणारे व्हिडिओ पाठवू शकतात.’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘‘प्रवाशांना सतत रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यासोबत जागरूक करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे आभार. चला तर मग, आपण सर्वांसाठी आपले रस्ते सुरक्षित करण्याप्रती योगदान देऊया.’’
एण्ड टीव्ही व मुंबई वाहतूक पोलिस प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे ड्रायव्हिंग करण्याचे आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत, क्यूंकी भाबीजी घर पर है!
तुम्ही andtvroadsafety.zee5.com या वेबसाइटवर जाऊ शकता आणि तुमच्या प्रियजनांना अंगूरी भाभीचे सुरक्षितता व्हिडिओ संदेश पाठवू शकता
Comments
Post a Comment