महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि असेंडास- फर्स्टपेस

महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि असेंडास- फर्स्टपेस यांच्यातर्फे तळेगावपुणे येथे एक दशलक्ष चौरस फुट जागेत वेयरहाउस लाँच करत असल्याची घोषणा

०.५ दशलक्ष चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२३- २४ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार

पुणे मार्च २०२३ – महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारतातील सर्वात मोठ्या सर्वसमावेशक लॉजिस्टिक्स सुविधा पुरवठादार कंपनीने तळेगाव पुणे येथे एक दशलक्ष चौरस फुट जागेत मल्टी- क्लायंट वेयरहाउस पार्क उभारत असल्याची घोषणा केली आहे. सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटीसह संपूर्ण वेयरहाउस तीन टप्प्यांत उभारले जाणार असून ०.५ दशलक्ष चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२३-२४ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

४० एकरांत वसलेल्या असेंडाज- फर्स्टपेस पुणे तळेगाव –II लॉजिस्टिक्स पार्कसाठी असेंडाज- फर्स्टपेससाठी हा मायक्रो- मार्केटमधील दुसरा प्रकल्प आहे. तळेगाव –II हा चाकण तळेगाव इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (सीटीआयसी) या भारतातील सर्वात महत्त्वाच्या उत्पादन क्लस्टर्सपैकी एकाचा भाग आहे. हा परिसर बऱ्याच काळापासून वाहनअभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांसाठीचे पारंपरिक उत्पादन केंद्र आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे सध्या सीटीआयसी कॉरिडॉरमध्ये लक्षणीय विकास होत आहे.

 

महिंद्रा लॉजिस्टिक्ससाठी हा एमएलएलच्या पॅन- भारतातील धोरणात्मक औद्योगिक क्लस्टरमधील मल्टी- युजर सुविधा नेटवर्कचा महत्त्वाचा भाग आहे. एक दशलक्ष चौरस फुटांच्या दर्जेदार वेयरहाउसिंग क्षमतेबरोबरच इथे एमएलएमलचे पहिले स्वयंचलित तंत्रज्ञान केंद्रही उभारण्यात येणार आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धीमत्ताइंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)रोबोटिक्स आणि ऑटोमेशनएआरव्हीआर, एजीव्हीज आणि ब्लॉक चेन अशा स्वयंचलित तंत्रज्ञानाचा विकास तसेच वापरावर भर देईल.

चाकण तळेगाव इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (सीटीआयसी) येथे उभारले जाणार असलेले हे आधुनिक आणि दर्जेदार वेयरहाउस कंपनीच्या शाश्वततेशी संबंधित नियमांनुसार बांधले जाणार आहे. ते उभारताना रिसायकल केलेले बांधकामाचे साहित्यसांडपाण्याचे व्यव्सथापनअक्षय उर्जाकचरा व्यवस्थापन आणि आधुनिक स्वयंचलनावर भर दिला जाणार आहे. शाश्वततेप्रती असलेली एमएलएलच्या बांधिलकीमुळे वेयरहाउसिंग सुविधा उर्जा कार्यक्षम असेल याची खात्री केली जाते तसेच आपल्या सर्व मल्टी- क्लाएंटभव्य वेयरहाउसचे बांधकाम इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) प्लॅटिनम सर्टिफिकेशन तसेच लीडरशीप इन एनर्जी अँड एन्व्हॉरमेंटल डिझाइन (एलईईडी) सर्टिफिकेशन साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. नवे वेयरहाइस आयजीबीसी गोल्ड/प्लॅटिनम प्रमाणित असेल व त्यामध्ये १०० टक्के सौर उर्जा अक्षय उर्जा वापरली जाईल. सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटीमुळे संपूर्ण विकास तीन टप्प्यांत केला जाणार असून ०.५ दशलक्ष चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२३-२४ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

 

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, चाकण परिसरात भारतातील आघाडीचे औदयोगिक आणि उपभोक्ता क्लस्टर वसलेले आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्ससाठी हा सर्वात मोठा परिसर आहे आणि असेंडस फर्स्टपेस यांच्यासह भागिदारीत येथे गुंतवणूक करताना आम्हाला आंद होत आहे. या एक दशलक्ष चौरस फुटांच्या एसएफटीमुळे आम्हाला या परिसरातील महत्त्वाच्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक सुविधांची श्रेणी आणखी विस्तारता येईल व दर्जेदार आणि तंत्रज्ञानावर आधारित सुविधा पुरवता येतील. या ठिकाणी आमचे पहिले स्वयंचलित तंत्रज्ञान केंद्र उभारले जाईल तसेच डीईआयए गुणवत्ता विकासावर भर दिला जाईल. आयजीबीसी/एलईईडी प्रमाणित आणि २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या वेयरहाउसची उभारणी केली जाईल.

 

असेंडास फर्स्टपेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अलोक बुनिया म्हणाले, महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने या परिसरात असलेल्या आमच्या सर्वात मोठ्या मल्टी- युजर सुविधा असलेल्या लॉजिस्टिक पार्कमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला याचा आनंद वाटतो. आम्ही उत्साहाने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे स्वागत करतो. ही भागिदारी भारतातील इतर प्रकल्पांमध्ये विस्तारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ही भागिदारी कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट आणि असेंडास- फर्स्टपेस यांनी इतक्या वर्षांत प्रस्थापित केलेला वारसा व दर्जाच्या विकासाचे प्रतीक आहे. ग्राहकांसाठी कुशल भागीदार म्हणून बांधील राहाण्यावर आणि देशभरातील महत्त्वाच्या लॉजिस्टिक्स व उत्पादन केंद्रांत लॉजिस्टिक्स व औद्योगिक पार्क्सचे दमदार नेटवर्क तयार करण्यावर आमचा भर आहे.

जेएलएलमधील लॉजिस्टिक्स व औद्योगिक विभागाचे श्री. संजय बजाज म्हणाले, या अनोख्या व्यवहाराचे सल्लागार म्हणून काम करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हे भारताच्या लॉजिस्टिक्स विकास गाथेचे प्रतीक आहे. २०२२ मध्ये लॉजिस्टिक्स कामांचे आउटसोर्स करणे हा मोठ ट्रेंड ठरला होता व यावर्षात अशाप्रकारच्या व्यवहारांचे प्रमाण ४३ टक्क्यांवर गेले होते.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..